💥जिंतूर येथील ज्येष्ठ पत्रकार डॉ.सुभाष राठी यांचे निधन....!


💥माजी आमदार गुलाबचंद राठी आणि उद्योजक बी.एन.राठी औंरगाबाद यांचे ते भाऊ होत💥 

जिंतूर प्रतिनिधी  / बी.डी. रामपूरकर

 जिंतूर येथील ज्येष्ठ पत्रकार तथा बालक विद्या मंदिर शाळेचे सचिव डॉक्टर सुभाष राठी यांचा दिनांक 15 मे रोजी रात्री उशिरा हृदयविकाराने निधन झाल्याची बातमी समोर आली आहे या घटनेमुळे जिंतूरात शोकाकुल पसरली आहे.

 जिंतूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि जिंतूर येथील बालक मंदिर शाळेचे सचिव आदरणीय व्यक्तीमत्व डॉ. सुभाषचंद्रजी राठी यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ते माजी आमदार गुलाबचंद राठी आणि उद्योजक बी. एन. राठी औंरगाबाद यांचे भाऊ होत तसेच विनय, शाम आणि संजय यांचे वडील होते. खंबीर नेतृत्व, स्पष्ट वक्ता, राजकारणी पत्रकार, जिंतूर तालुक्यातील पत्रकाराचे मार्गदर्शक म्हणून, अशी त्यांची ओळख होती त्यांचा अंत्यसंस्कार दिनांक 16 मे रोजी सोमवार दुपारी 4:30 वा. वैंकुठधाम स्मशान भूमी जिंतूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या