💥पुर्णा नगर परिषदेचे कनिष्ठ अभियंता संजय दिपके यांच्या चौकशीच्या आदेशाचे झाले काय ?

 


💥नगर पालिका प्रशासन विभागाच्या सहआयुक्तांनी शहरातील बोगस कामां संदर्भात दिले होते चौकशीचे आदेश💥

पुर्णा (दि.०२ मे २०२२) - घोटाळ्यांवर घोटाळे करण्यात अव्वल दर्जा प्राप्त केलेल्या पुर्णा नगर परिषदेचा कारभार प्रशासक म्हणून नेमलेल्या एसडीएम सुधीर पाटील यांच्याकडे गेल्यानंतर देखील नगर परिषदेतील घोटाळ्यांची मालिका थांबता थांबत नसून प्रशासक सुधीर पाटील यांनी पदभार सांभाळल्यानंतर देखील एकामागून एक घोटाळे बाहेर पडत असून बोगस बांधकाम कामगार अनुभव प्रमाणपत्र घोटाळा,बेकायदेशीररित्या चार बोगस कर्मचाऱ्यांचा भर्ती घोटाळा,शहरातील जुना मोंढा परिसरातील गोंधळ सम्राट राजाराम बापू कदम सांस्कृतिक सभागृहा लगतच्या पाच ते सात व्यवसायिक गाळ्यांचा घोटाळा,शहरातील रस्ते/नाल्यांच्या बांधकामासह बांधकाम दुरूस्ती घोटाळा अशी अनेक प्रकरण उजेडात येत असून नगर परिषदेचे भ्रष्ट कनिष्ठ अभियंता संजय दिपके यांच्या कारकिर्दीत त्यांच्या देखरेखीखाली शहरातील विविध भागात सिमेंट नाली/रस्त्यांसह दुरूस्तीची बोगस व निकृष्ट दर्जाची कामे झाले या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या या संदर्भात मागील ३१ मार्च २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नगर पालिका प्रशासन विभागाचे सहआयुक्तांनी जा.क्र.नपाप्र/संकीर्ण/कावी/२०२२/३७८ अनुसार लेखी स्वरूपात आदेश जारी करून नगर परिषद कनिष्ठ अभियंता संजय दिपके यांच्या कामांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्याचे लेखी आदेश नगर परिषद मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या नावे पारीत केले होते.

जिल्हाधिकारी कार्यालय नगर पालिका प्रशासन विभागाचे सहआयुक्तांनी दिलेल्या आदेशाला तब्बल एक महिण्याच्या वरचा कालावधी उलटला असतांना मुख्याधिकारी नरळे यांनी कनिष्ठ अभियंता दिपके यांच्यावर काय कार्यवाही केली ते अद्यापही गुलदस्त्यातच असून मुख्याधिकारी नरळे यांनी सहआयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली की काय ? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या