💥वाडी दमई येथे वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाणच्या शाखेचे उदघाटन...!


💥यावेळी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाण महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मदन लांडगे यांची प्रमुख उपस्थिती💥 

परभणी - येथील दि. 3 मे रोजी वाडी दमई येथे  खा.संजय जाधव   यांच्या हस्ते वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाण शाखेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाण महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष डॉ. मदन लांडगे व प्रमुख उपस्थिती सोशल मिडिया प्रमुख सोमेश्वर लाहोरकर,शिवचरण बीडकर होते.

तसेच महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाण चे अध्यक्ष डॉ. मदन लांडगे व खा.संजय जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करून दिवसभर  जयंती निमित्त ग्रामस्थ यांनी विविध कार्यक्रम राबविले.

यावेळी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठाणचे शाखा अध्यक्ष दिपक बीडकर,उपाध्यक्ष नागेश विभुते,सचिव रमेश भुरे,सदस्य महेश बोरामणे,महेश बीडकर, संदिप बीडकर, मारोती भुरे,दिलीप बीडकर, शिवकुमार विभुते, विनायक बीडकर, महेश विभुते, राम भुरे,गजानन विभुते, शुभम साडेगावकर आदि.वीरशैव मंडळ यांनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या