💥पुर्णा येथील स्वातंत्र्य सैनिक सुर्यभानजी पवार महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांचा स्मृतीदिन साजरा....!


💥छत्रपती शाहू राजे यांच्या शंभराव्या स्मृतीदिनानिमित्त शंभर सेंकद स्तब्धता पाळून सामुहिक अभिवादन💥 

पूर्णा (दि.०६ मे २०२२) - येथील स्वातंत्र्य सैनिक सुर्यभानजी पवार महाविद्यालयात समतेचे महानायक, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांचा शंभरावा स्मृतीदिन नुकताच साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संतोष कुऱ्हे यांनी राजर्षी शाहू राजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.जगन्नाथ टोंपे, प्रा.वैशाली लोणे, सांस्कृतिक प्रभारी प्राध्यापक डॉ. प्रकाश सूर्यवंशी, प्रसिद्धी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. संजय कसाब,क्रीडा संचालक डॉ.भारत चापके आदींनीही राजश्री शाहू राजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.याप्रसंगी छत्रपती शाहू राजे यांच्या शंभराव्या स्मृतीदिनानिमित्त शंभर सेंकद स्तब्धता पाळून प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी सामुहिक अभिवादन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा जगन्नाथ टोंपे यांनी मांडले.सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रभारी प्रकाश सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रा.वैशाली लोणे यांनी मानले कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या