💥पुर्णा नगर परिषदेतील कनिष्ठ अभियंता संजय दिपके यांच्या सहआयुक्तांनी दिलेल्या चौकशी आदेशाला केराची टोपली...!

 


💥भ्रष्ट कनिष्ठ अभियंता दिपकेंच्या देखरेखीखाली झाली शहरातील विविध भागात कोट्यावधी रुपयांची बोगस कामे💥 

💥नगर पालिका प्रशासन विभागाच्या सहआयुक्तांनी शहरातील बोगस कामां संदर्भात दिलेल्या चौकशी आदेशाचे झाले काय ?💥

पुर्णा (दि.०२ मे २०२२) - पुर्णा नगर परिषदेतील घोटाळ्यांच्या मिलीकेला लगाम लावण्याऐवजी जास्तच खतपाणी घालण्याचा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असल्यामुळे नगर परिषदेतील भ्रष्ट अधिकारी/कर्मचारी घैटाळे करण्यात माहीर झाल्याचे निदर्शनास येत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या चौकशी आदेशाला देखील जुमानत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

पुर्णा नगर परिषदेतील कनिष्ठ अभियंता संजय दिपके यांच्या कारकिर्दीत त्यांच्या देखरेखीखाली शहरातील विविध भागात बोगस सिमेंटरोड नाल्यांची कोट्यावधी रुपयांची कामे करण्यात आली यात अनेक रस्ते व नाल्यांची पुर्वीची नाव बदलून त्याच कामांवर थातूर मातूर काम करून कोट्यावधी रुपयांची बोगस बिल देखील काढण्यात आल्याने या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या या संदर्भात मागील ३१ मार्च २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नगर पालिका प्रशासन विभागाचे सहआयुक्तांनी जा.क्र.नपाप्र/संकीर्ण/कावी/२०२२/३७८ अनुसार लेखी स्वरूपात आदेश जारी करून नगर परिषद कनिष्ठ अभियंता संजय दिपके यांच्या कामांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्याचे लेखी आदेश नगर परिषद मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या नावे परभणी जिल्हा नगर पालिका प्रशासन विभागाच्या सहआयुक्तांनीपारीत केले होते परंतु संबंधित आदेशाला नगर परिषद मुख्याधिकारी अजय नरळे यांच्यासह प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी देखील केराची टोपली दाखवली काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून जिल्हाधिकारी कार्यालय नगर पालिका प्रशासन विभागाचे सहआयुक्तांनी दिलेल्या आदेशाला जवळपास दोन महिण्याचा कालावधी उलटत असतांनाही या संदर्भात कुठलीच कारवाई झालेली नसल्यामुळे संबंधित भ्रष्ट कनिष्ठ अभियंता दिपके यांना वाचवण्यासाठी सहआयुक्तांचा आदेशही डावलण्याचा गंभीर प्रकार नगर परिषद प्रशासनाकडून होत असल्याचे दिसत आहे..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या