💥गावातील जिल्हा परिषद शाळेच्या कमानीचे जनस्वराज फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले भूमिपूजन💥
पुर्णा ; तालुक्यातील मौ.सुहागन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे रविवार दि.०१ मे २०२२ रोजी सकाळी ९:३९ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कमानीचे भूमिपूजन जनस्वराज फाऊंडेशनच्या माध्यमातून झाले.
भूमिपूजन जनस्वराज फाऊंडेशनचे अध्यक्ष रामराजे भोसले, अभिनव शाळेचे माजी मुख्याध्यापक हिराजी भोसले व जेष्ठ नागरिक बळीरामजी भोसले यांनी कुदळ मारून केले. या भूमिपूजनास केंद्र प्रमुख प्रभाकर भोसले, जि.प.शिक्षक कावलगाव रामेश्वर भोसले, अखिल भारतीय पत्रकार संघनटेचे तालूका अध्यक्ष दौलत भोसले, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भोसले, ग्रामपंचायत सदस्य माणिकराव भालेराव, सुभाष भोसले, बालाजी ग्यानोजी भोसले, रामचंद्र भोसल, नारायण रामजी भोसले, होनाजी भोसले, ज्ञानेश्वर रामजी भोसले, जि. प. शाळेतील सर्व शिक्षक व गावातील नागरीक उपस्थित होते. रामराजे भोसले व गावक-यांच्या मदतीने गावामध्ये शाळेला चांगले स्वरूप देणारी एक चांगली वास्तू उभी राहत आहे याचा गावक-यांनी आंनद व्यक्त केला तर शाळेच्या विविध कामांसाठी व गावासाठी आम्ही कायम बांधील राहू असे मत जनस्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष रामराजे भोसले यांनी व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी उपस्थितांचे आभार मानले....
0 टिप्पण्या