💥परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्याल्या मौजे मोहाळा येथे वाळू तस्करांच्या पोलिसांकडून मोठी कारवाई...!


💥या धाडसी कारवाईत पथकाने ३६ रेती तस्करांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत💥

परभणी (दि.११ मे २०२२) :-  जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातल्या मौजे मोहाळा येथील गोदावरी नदीच्या पात्रात जिल्हा पोलिस दलाच्या एका पथकाने आज बुधवार दि.११ मे २०२२ रोजी पहाटेच्या सुमारास छापा टाकून बेकायदेशीर सेक्शन पंप अर्थात बोटीचा वापर करून रेतीचा उपसा करणाऱ्या जेसीबी/पोकलेन मशीन,हायवा ट्रक्स वगैरे ताब्यात घेतले या धाडसी कारवाईत पथकाने ३६ रेती तस्करांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.


परभणी जिल्ह्यात सर्वत्र गोदावरी-पुर्णा नदीच्या पात्रात काही दिवसांपासून जेसीबी मशीनचा वापर करीत बेसुमार रेतीचा उपसा सुरू आहे. अहोरात्र जेसीबी/पोकलेन मशीन तसेच सेक्शन पंप अर्थात बोटीच्या साहाय्याने रेती उपसा होत असून असंख्य टिप्पर हायवा ट्रेक्टर द्वारे या चोरट्या रेतीची जिल्ह्यात सर्वत्र तस्करी केली जात आहे. पावसाळा लागण्यापूर्वी त्या चोरट्या रेतीचे जागोजाग प्रचंड साठेही केले जात आहेत .

या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना सहाय्यक पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा यांच्या पथकाने बुधवारी पहाटे साडेपाच वाजता सोनपेठ तालुक्यातील मौजे मोहाळा येथील गोदावरी नदीच्या पात्रात छापा टाकला,

त्यावेळी या नदीच्या पात्रात दोन बोटी द्वारे तसेच चार पोकलेन द्वारे वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा होतो. चौकशी केली तेव्हा बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा होतो आहे हे लक्षात आल्याबरोबर या पथकाने दोन बोटी,चार पोकलेन,बारा हायवा ट्रक तसेच वाळूने भरलेले अन्य दोन ट्रँक्स तात्काळ जप्त केले.

 चौकशीत संजय मुंडे नामक व्यक्तींच्या सांगण्यावरून वाळूचा उपसा होतो आहे असे प्रत्यक्षदर्शी सांगितले ,पोलिसांच्या पथकाने मशनरी वाळूचा साठा जप्त करीत सोनपेठ पोलीस ठाण्यात त्या बोटी पोकलँड मशीन त्यांच्या मालक- चालकांविरुद्ध असे एकूण पस्तीस जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांच्या या कारवाईने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे जिल्हा पोलिस यंत्रणेने पूर्णा पालम गंगाखेड सोनपेठ या भागातील गोदावरी नदीच्या पात्रातील बेसुमार उपसा विरोधात कठोर भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे .महसूल प्रशासन अंतर्गत तहसीलदार उपविभागीय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी या वाळू माफियांविरुद्ध अद्यापपर्यंत कधीही कठोर भूमिका घेतली नाही त्याचा परिणाम संपूर्ण जिल्ह्यात वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या