💥पोलिसांना घटनेची माहीती मिळताच घटनास्थळावर जावुन पाहणी करुन पंचनामा केला💥
वाशिम:-मंगरुळपीर शहरातील नक्षञ ज्वेलर्सवर दिनांक १६ च्या राञी चारच्या सुमारात शटर तोडुन चोरांनी सोन्याच्या दुकानावर डल्ला मारला असुन घटनेची माहीती कळताच पोलिसांनी सदर ठिकाणचा पंचनामा करत मिळालेल्या सिसिटिव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु केले आहे.श्वानपथक आणी फोरेन्सिक लॅबने घेतलेल्या ठसावरुन तपासाची दिशा ठरवत वाशिम स्थानिक गुन्हे शाखा,डिबी पथक तपासकामी लागले आहेत.
वाशिमच्या मंगरुळपीर शहरातील राठी काॅम्पलेक्समध्ये असलेल्या नक्षञ ज्वेलर्समध्ये शटरचे कुलुप तोडून चोरांनी हाथ साफ केल्याची घटना मध्यरात्री सुमारास घडली.चोरांनी दुकानातले सिसिटिव्ही कॅमेरेही काढुन नेवुन डिवीआर मशिनही नेली आहे.पोलिसांना घटनेची माहीती मिळताच घटनास्थळावर जावुन पाहणी करुन पंचनामा केला.दरम्यान पुढील तपासासाठी श्वानपथक आणी डिबी पथकाला प्राचारण केले आहे.दुकानातील नेमका किती रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला याचा पुढील तपास मंगरूळपीर पोलीस करीत आहेत.मागील आठवड्यात याच कॉम्प्लेक्स मधील ज्वेलर्सच्या दुकानात चोरांनी अडीच लाखाचा मुद्देमाल चोरून नेला होता. त्यामुळं पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.सध्या वाशिम जिल्ह्यात चोरींचे प्रमाण वाढले असुन काही घटनांचा तपास वाशिम पोलिस दलाने मोठ्या शिताफिने लावला तर काहींचा तपास सुरु आहे.मंगरूळपीर पोलिसांनी नक्षञ ज्वेलर्सवरील चोरीचा तपास सुरु केला आहे.सदर घटना राञी चारच्या सुमारास घडल्याचे समजते व यासंदर्भात एका फोरव्हिलरने चोर सदर ज्वेलर्सवर आल्याचे सिसिटिव्हित कैद झाले आहे.ऊपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात मंगरुळपीरचे ठाणेदार यांच्या नेतृत्वात वाशिम स्थानिक गुन्हे शाखा,डीबी पथक,पोलिसदल तपासकामी लागले आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
0 टिप्पण्या