💥पूर्णा तालुका शेती सेवा ग्रुप वतीने सेंद्रिय शेती प्रकल्पाचे डॉ.आनंद गोरे यांचा सत्कार....!


💥आनंद गोरे यांचा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ अशोक ढवण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला💥

धानोरा काळे/प्रतिनिधी

             वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी अंतर्गत राज्यस्तरीय ऑनलाईन सेंद्रिय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे एक महिनाभर सूक्ष्म नियोजन करून यात विविध विषयातील तज्ज्ञ,बाहेर राज्यातील अधिकारी शास्त्रज्ञ,प्रयोगशील शेतकरी यांच्या माध्यमातून सविस्तर असे शेतीतील अडचणी, उतपादनवाढ,बाजारपेठ ,बारकावे, मिश्र पीक पद्धत याविषयावर मार्गदर्शन राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल "पूर्णा तालुका शेती सेवा ग्रुप" च्या वतीने सेंद्रिय शेती प्रकल्प प्रमुख डॉ आनंद गोरे यांचा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ अशोक ढवण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,

यावेळी संचालक संशोधन डॉ.डी.पी.वासकर,कुलसचिव धीरज कदम,संस्थापक तथा उद्यान पंडित शेतकरी प्रताप काळे, कृषिभूषण ओंकार शिंदे,जिजामाता कृषी भूषण मेघा देशमुख,शेतीनिष्ठ शेतकरी गणपतराव शिंदे,बाबासाहेब रनेर,शास्त्रज्ञ मीनाक्षी पाटील, पपिता गोरखेडे ,सतीश कटारे आदी उपस्थित होते .यावेळी प्रताप काळे यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात विविध शास्त्रज्ञांना मार्गदर्शनासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल व  प्रत्येक सत्रात अनुभव कथनासाठी शेतकऱ्यांना संधी दिल्याबद्दल विद्यापीठाचे आभार मानले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या