💥दलित वस्तीमधील नागरिकांच्या पिण्याचा प्रश्न गंभीर ; महिलांना पाण्यासाठी भरउन्हात कोसो दूरपर्यंत करावी लागते कसरत💥
जिंतूर प्रतिनिधी/ बी.डी. रामपूरकर
जिंतूर (दि.१२ मे २०२२) - तालुक्यातील बोर्डी येथील दलित वस्तीमधील महिला व नागरिकांनी पाण्यासाठी चक्क सरपंचाच्या घरी मोर्चा काढून पाणीपुरवठा करण्याची मागणी सरपंचाकडे केली आहे.जिंतूर तालुक्यातील बोर्डी हे गाव आमदार सौ.मेघना साकोरे बोर्डीकर यांचे गाव असुन या गावातील दलित वस्ती मधील नागरिकांना पाण्याची खूप अडचण होत आहे.
येथील महिलांना पाण्यासाठी भर उन्हात कोसो दूरपर्यंत कसरत करावी लागत असुन महिला आमदारांच्या गावामध्ये महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. हे किती दुर्दैवी बाब आहे. दलित वस्तीमध्ये मागील पंधरा दिवसापासून पाण्याची टंचाई भासत आहे.या बाबीकडे सरपंचाने दुर्लक्ष करत वेळ काढूपणा धोरण अवलंबलेआहे.परंतु अखेरला पाण्याची परिस्थिती गंभीर बनल्याने दलित वस्तीमधील महिलांनी व नागरिकांनी आज दिनांक 11 मे बुधवार रोजी सकाळी आठ वाजता चक्क सरपंचाच्या घरी मोर्चा काढून पाण्यासाठी ठिय्या केला होता. उपस्थित मोर्चेक-यांना सरपंचानी लवकरच पाण्यासाठी टॅंकर सुरू करून पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी काढू असे आश्वासन दिले.मोर्चामध्ये कमल सरकटे,मीना भारशांकर,विजयमाला सरकटे,वर्षा सरकटे,संघर्ष सरकटे , भारत भारशांकर,सुनील सरकटे,संदीप दांडगे,अनिल दांडगे यांच्यासह अनेक महिला नागरिक व लहान मुलेही सामील झाली होती....
0 टिप्पण्या