💥हिंगोली ते सेनगाव मार्गावर डीजे घेऊन जाणार पिकअप उलटून एक जण ठार तर सहा जण जखमी....!


💥हिंगोली ते सेनगाव मार्गावर गेल्या सात दिवसात सहा जणांचा अपघाती मृत्यू💥 


शिवशंकर निरगुडे : हिंगोली प्रतिनिधी 

हिंगोली ते सेनगाव मार्गावर आज रीधोरा पाटी जवळ डीजे घेऊन जाणार पिकअप पलटी होऊन या मधील एक जण जागीच ठार झाले आहे तर सहा जण गंभीर जखमी आहेत हि घटना दि 22/05/2022 रोजी दुपारी एक वाजता घडली आहे या अपघातात योगेश बंडू लाड वय 22 वर्ष रा .अंजनी बुद्रुक तालुका मेहकर असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील अंजनी बुद्रुक येथील काही जण डीजे घेऊन पिकअप ने आज दुपारी कार्यक्रमासाठी नरसी नामदेव येथे येत होते त्याचे पिकअप हिंगोली ते सेनगाव मार्गावर रीधोरा पाटी जवळ आले असतांना चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटला व या अपघातामधे एक जण ठार झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघाताची माहिती मिळताच नरसी नामदेव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण नागरे सेनगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक ठोके सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आर .बी .पोटे जमादार हेमंत दराडे जमादार पि .जी .डवले .महाजन यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी अपघातातील मयत योगेश लाड व जखमी असलेले रामदास श्रीरंग बोराडे .नागेश गजानन पायघन .लक्ष्मण श्रीकृष्ण पारोडकर .विष्णू दत्तराव टोनवे .सुरेखा श्रीकृष्ण पायघन .आकाश संतोष लाड .यांना उपचारासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी माने यांच्या वाहनाने तर काही जणांना रुग्ण वाहिके द्वारे तातडीने हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे जखमी पैकी दोघांच्या डोक्याला गंभीर मार लागला आदल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे या प्रकरणी अद्याप पर्यन्त नरसी पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती

हिंगोली ते सेनगाव मार्गावर गेल्या सात दिवसात सहा जणांचा अपघाती मृत्यू :-

हिंगोली ते सेनगाव या मार्गावर गेल्या तीन दिवसा पासून रोजच अपघात घडत आहेत दि 16/05/2022 रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास कार आणि मोटरसायकल अपघात झाला या मधे मोटरसायकल वरील दोघे जन जागीच ठार झाले होते आणि दि 20/05/2022 रोजी सकाळी 8 च्या सुमारास कार आणि टेम्पो चा भीषण अपघात झाला यात कार मधील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे या कार मधील व्यक्तीला जे सी पि च्या सहाय्याने कारचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले होते आणि आज कार ऑटो अपघातात दोघे जन ठार झाले आहेत या रोडवर अपघातचे प्रमाण वाढले आहे दि 18/05/2022 रोजी देखिल सेनगाव तालुक्यातील बाभूलगावजवळ दोन दुचाकीची समोरा समोरा धडक झाली या मधे एक जन जागीच ठार झाले होते तर तिघे जन गंभीर जखमी झाले होते .गेल्या चार दिवसात 6 जणांचा जीव अपघातमुळे गेले आहेत आणि आज रीधोरा पाटी जवळ डीजे घेऊन जाणार पिक अप उलटून या मधील एक जन जागीच ठार झाला आहे 

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या वतीने देशभर महामार्गचे जाळे निर्माण करण्यात येत आहे गुळगुळीत झालेल्या सिमेंट रस्त्यावर खेड्यातील सर्व सामान्य नागरिक नियमांचे पालन न करता सुसाट वेगाने गाड्या पळवत आहेत त्यामुळे हिंगोली सेनगाव रोडवर रोजच अपघात होत आहे रोजच अपघात होत असल्याने आर .टी .ओ विभागाच्या वतीने आज सुरू केलेल्या कारवाई ने अनेक वाहन चालकांना आत्ता शिस्त लागायला सुरुवात झाली आहे नागरिकांनी नियमांचे पालन करून वाहने सावकाश पणे चालवावे असे आव्हान आर .टी .ओ .कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या