💥परभणी येथील धार रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात प्रहारचे आंदोलन...!


💥प्रहार जनशक्ती पक्षाने केले जोरदार रास्ता रोको आंदोलन💥

परभणी (दि.२६ मे २०२२) - मागील तीन वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी यानी धार रस्तावर काँक्रिटचा रस्ता तयार कला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार जिथे रस्ता केला जातो त्या रस्त्यावरील सर्व अडथळे दूर करणे आवश्यक असते परंतु सार्वजनिक अधिकाम विभागाने धार रस्त्याचे काँक्रिट काम सुरू करण्यापूर्वी रस्त्यामधील ३६ विद्युत खांब व चार विद्युत रोहित्र ( डी पि ) रस्त्यावरून न काढता रस्त्याचे काम केले त्यामुळे परिसरातील नागरीकांना रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत आवघड झाले आहे त्याशिवाय रल्यावर विद्युत खांबावरील लटकणारे विद्युत तार हे धोकादायक परिस्थितीत आहेत. तसेच संबंधीत रस्त्याचे काम तीन वर्षापासून सुरु असून ते अद्यापही अर्थवट आहे.


धार रस्त्याच्या मध्यभागी असलेले विद्युत खांव तात्काळ काढावे व रखडलेले रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीन दिनांक १७ मे २०२२ राजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. पाटील यांची भेट घेऊन संबंधीत काम तात्काळ पूर्ण करावे अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता.

आज दिनांक २६ मे २०२२ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या नेतृत्वाखाली धार रोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्ट कारभाराची चिरफाड कली तसेच लोकप्रतिनिधी, भ्रष्ट अधिकारी व ठराविक गुत्तेदाराचे एक रकेट जिल्हयाभरा मध्ये सक्रिय असल्यान परभणी जिल्हयामध्ये अनेक बोगसगस काम होत आहेत त्यामुळे परभणीचा विकास खुंटलेला आहे असा गंभीर आरोप केला. या आंदोलनानंतर ही धार रोड वरील विद्युत खांब व रस्त्याचे रखडलेले काम करण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग दिरंगाई करणार असेल तर पुढील आंदोलन हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात साप सोडण्याचे असेल असा इशारा ही या वेळी दिला. या आंदोलनात परिसरातील नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला.

आंदोलन करु नये याकरीता नानलपेठ पोलीस स्टेशन परभणीच्या वतीने आंदोलनकर्त्यांना सी.आर.पी.सी. १४९ नुसार नोटीसा देऊन प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली होती असे असतांनाही प्रहार जनशक्ती पक्षाने आजचे रास्ता रोको आंदोलन कले हे विशेष आंदोलन स्थळी नानलपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक श्री. कुंदनकुमार वाघमारे यांनी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त व अतिरिक्त सुरक्षा बलाचे जवान तैनात केले होते. आंदोलना नंतर आंदोलनकर्त्यांना पोलीसांना ताब्यात घेण्यात आले नानलपेठ पोलीस स्टेशन येथे काळ बसवुन आंदोलनकर्त्यांना सोडून देण्यात आले.

आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, वाहतुक आघाडी तालुका प्रमुख रामेश्वर जाधव, शहर प्रमुख धर्मेंद्र तुपसमुद्रे, सर्कल प्रमुख शाम भोंग, शहर चिटणीस वैभव संघई, मिडीया प्रभारी नकुल होगे, उध्दव गरुड , माऊली गरुड , माऊली भोपाळ कृष्णा गोपनवाड, विठ्ठल गरुड, हनुमान गरुड, अंकुश चव्हाण, रमेश काळे, राजेश दशमुख आदीनी  सहभाग नोंदविला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या