💥मंगरुळपीर शहराची नियमित साफसफाई ठेवणार्‍या पथकप्रमुख व त्या ५५ शिलेदारांना 'स्वच्छतादुत' म्हणून सम्मानित करा...!


💥पन्नास हजार लोकवस्तीच्या मंगरूळपीर शहराच्या स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनतीची पराकाष्ठा💥

💥मंगरुळपीर शहराला स्वच्छ व सर्वांग सुंदर बनवणार्‍या शिलेदारांना नागरीकांचा सलाम💥

फुलचंद भगत

वाशिम:-अंदाजे पन्नास हजार लोकवस्ती असलेल्या मंगरुळपीर शहराला सर्वांग सुंदर आणी स्वच्छ ठेवण्यासाठी जे दररोज मेहनत घेणार्‍या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागातील त्या ५५ कर्मचार्‍यांचे शहरवाशीयांमधुन कौतुक होत असुन प्रशासनाच्या वतीने यांना स्वच्छतादुत पुरस्कार देवून सन्मानित करावे अशी मागणी शहरवाशीयांमधुन होत आहे.

               मंगरुळपीर शहराला ऐतीहासिक वारसा लाभलेला आहे.जगातील साडेतीन कलंदरापैकी एक असलेल्या दादा हयात कलंदर दर्गाह आणी पंचक्रोशीत प्रसिध्द असलेले संत बिरबलनाथ महाराजांची ही वस्ती असलेल्या नगरीला नाथ पिरांचे गाव म्हणून ओळखल्या जाते.या शहराला जवळपास ७५ खेडी लागुन असल्याने शनिवार रोजी आठवणी बाजारही भरतो.अशा या शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी आहे ती नगरपरिषदेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाकडे.या विभागाचे अंदाजे ५५ शिलेदार दररोज आपल्या मेहनतीची पराकाष्ठा करुन शहरात स्वच्छता नांदावी यासाठी काम करत असतात.दररोज शहरात असलेली ७५ की.मी.नाली स्वच्छ करणे तसेच शहरपरिसरातील ९२ कि.मी असलेल्या रोडचीही स्वच्छता ठेवण्याचे काम या स्वच्छता दुतावर आहे.शहराला १६ की.मी.कर्मर्शीअल ऐरीया आहे तो रोज स्वच्छ केल्या जातो.शनिवारला मंगरुळपीर शहरात आठवडी बाजार भरतो त्यामुळे तो परिसर बाजार झाल्यानंतर साफसफाई करायला तीन दिवस लागतात.सोबतच न.प.चे शाॅपींग सेंटर,न.प.च्या सहा शाळा व त्या शाळांतील मुतार्‍या शौचालये,शहरातील सार्वजनिक सौचालये,बेवारस मृत पावलेले जनावरे ऊचलने,मल ऊपसक यंञाने सार्वजनिक व खाजगी शौचालये साफ करणे,यासोबतच वेळेवरही काही शहरातील स्वच्छताविषयक कामे निघत असतात तेही करणे या शिलेदारांच्या शिरावर रोजचे ओझे आहे तरीही न थकता,न डगमगता आपले काम इमाने इतबारे करण्यासाठी हे स्वच्छतादुत झटत असतात.ही सगळी यंञना न.प.चे मुख्याधिकारी व स्वच्छतादुताचे मार्गदर्शक व नेहमी पाठीशी कौतुकाची थाप देणारे स्वच्छता व आरोग्य विभागाचे निरिक्षक राजेश संगत यांच्यामुळे हे यशस्वीपणे शक्य होत आहे.शहराला स्वच्छ करण्यासाठी ६ घंटागाड्या,३ सायकल रिक्षा,१ मलऊपसक यंञ,३ ट्रक्टर ऊपलब्ध आहेत.शहरात १८ वार्ड असलेल्या ६ वार्डामिळुन १ झोन याप्रमाणे यासाठी १ पथक प्रमुख,३ झोनला ३ सुपरवायझर कार्यरत आहेत.याबरोबरच कर्मचार्‍यांची नियमानूसार कर्तव्यआखनीही केली आहे.१५ कर्मचारी ट्रक्टरवर शहरातील कचरा ऊचलण्यासाठी दररोज काम करतात,१२ कर्मचारी घंटागाडीवर,१८ रोडसफाईवर,४ सायकल रिक्षा घंटागाडी,३ सार्वजनिक शौचालये,४ स्विपींगवर,२३ कर्मचारी नालीसफाईकरीता,३ कर्मचारी घनकचर्‍याच्या साईडवर,२ कर्मचारी न.प.च्या ऊद्यानावर यासोबतच आवश्यकतेनूसार कर्मचारी कामाला लावुन शहराची नियमित साफसफाई ठेवण्याचे काम करत असतात.आपत्कालीन परिस्थीतीत हेच शिलेदार राबत असतात तर धार्मीक स्थळावरचीही कार्यक्रमप्रसंगी स्वच्छता ठेवण्याची जबाबदारीही इमाने ईतबारे पार पाडत असतात.पन्नास हजार लोकवस्तीच्या मंगरुळपीर शहराची स्वच्छता ठेवण्यासाठी रोज १० ते ११ मॅट्रीक टन घनकचर्‍याची ऊचल केल्या जाते.डिपिआरनुसार मंगरुळपीर शहराला १७० कर्मचारी स्वच्छता विभागाला आवश्यक आहेत परंतु फक्त ५५ कर्मचारीच हे शहराच्या स्वच्छतेसाठी कर्तव्यावर असुन परीसर सर्वांग सुंदर व स्वच्छ ठेवत आहेत ही अभिमानाची बाब आहे.स्वच्छता व आरोग्य विभागाचे प्रमुख राजेश संगत आणी त्यांचे ५५ स्वच्छतादुताचे शहराच्या स्वच्छतेविषयीची कामगीरी बघता त्यांना प्रशासनाकडुन सम्मानित करावे अशी शहरवाशीयांनी मागणी केली आहे.


प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या