💥पंढरपूर,पुणे प्रवासी रेल्वे गाड्यांना डेमू ऐवजी साधारण डब्बे जोडण्याची मागणी...!


💥मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघ व आखिल भारतीय वारकरी महामंडळाने रेल्वे प्रशासनाकडे केली निवेदनाद्वारे केली मागणी💥 

परभणी / प्रतिनिधी

रात्रभर धावणाऱ्या पंढरपूर,पुणे रेल्वे गाड्यांना डेमू ऐवजी पूर्वी प्रमाणे साधारण डब्यांची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघ आणि आखिल भारतीय वारकरी महामंडळाने संयुक्त रूपाने परभणी स्टेशन मास्तर अरविंद इंगोले यांच्या मार्फत नांदेड रेल्वे विभागाकडे एक निवेदन देऊन मागणी केली आहे. मराठवाडा विभागातून दररोज हजारोंच्या संख्येने प्रवाशी पंढरपूर, पुण्याला जातात. रात्रभर तब्बल 10 ते 12 तास डेमू लोकल मध्ये बसून प्रवास करणे म्हणजे नरकयातना आहे.

कोरोना महामारी संपल्यावर मराठवाडा विभागातून पंढरपूर दर्शनासाठी धावणार्या एकमेव निजामाबाद-पंढरपूर रेल्वेचे डेमू मध्ये रुपांतरीत करण्यात आले. रात्रभर 10 ते 12 तासांपर्यंत डेमू लोकल मधून प्रवास करणे वारकरी तसेच प्रवाश्यांना डोकेदुखी ठरत आहे. सदर डेमू लोकल मध्ये स्लीपर आणि वातानुकूलित कोचेस ची सुविधा नाही, डेमू लोकलचे दार सुरक्षित रूपाने बंद होत नसल्याने रात्रीच्या वेळी डास, किड्यांचा त्रास वाढतो, लूटमारीच्या घटनांमुळे  प्रवाश्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रभर धावणार्या रेल्वेत बसून जाणे शक्य होत नसल्याने जेष्ठ नागरीक, महिला प्रवाशी तसेच वारकरी मंडळी त्राही त्राही करत आहेत. निजामाबाद-पुणे रेल्वेत देखील प्रवाश्यांची परिस्थिती सारखीच आहे. तरी दक्षिण-मध्य आणि मध्य रेल्वे विभागातील रेल्वे प्रशासनाने वरील सर्व अडचणी ओळखून  निजामाबाद-पंढरपूर आणि निजामाबाद-पुणे गाड्यांना डेमू कोचेस ऐवजी पूर्वी प्रमाणे साधारण डब्यांची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रा सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, श्रीकांत गडप्पा, कादरीलाला हाशमी, प्रवीण थानवी, दयानंद दीक्षित तसेच आखिल भारतीय वारकरी महामंडळाचे बालासाहेब मोहिते पाटील, ज्ञानोबा माऊली शिंदे,दत्ता गिरी, पुरुषोत्तम झाडगांवकर, तुकाराम झावलगांवकर, मधुकर नावरे,विनायक नावरे,भगवानराव जवंजाळ,माऊली पवार, अनिल सोनुणे,वसंत झवर,इत्यादींनी केली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या