पुर्णा (दि.१८ मे २०२२) - शहरातील विविध भागातील लहाण-मोठ्या नाल्यांसह विविध भागात स्वच्छते अभावी साचलेल्या कचऱ्यांच्या ढिगारामुळे संपूर्ण शहरात डासांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले असून मान्सुन अर्थात पावसाळा सुरू होण्यापुर्वी शहरातील सर्व लहाण मोठ्या नाल्यांची साफसफाई युध्दपातळीवर होण्याची आवश्यकता आहे.
पुर्णा नगर परिषदेचे प्रशासक सुधीर पाटील व मुख्याधिकारी अजय नरळे यांनी मान्सुनपुर्व शहरातील नाल्यांच्या स्वच्छता व दुरूस्तीसह विविध भागातील कचऱ्यांच्या ढिगारांची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने स्वच्छता विभागाला आदेश देणे आवश्यक झाले आहे कारण मान्सुन अर्थात पावसाळ्याला अवघ्या काही दिवसात सुरूवात होणार असल्यामुळे पावसाळा सुरू होण्यापुर्वी शहरातील संपूर्ण भागांतील आऊटलेट असलेल्या डोबी मोहल्ला-अण्णाभाऊ साठे नगर ते थुना नदीपर्यंत वाहणाऱ्या मुख्य नाल्यासह,महाविर नगर भागातीतून अजिज नगर परिसरात वाहणाऱ्या मोठ्या नाल्यासह कावशी हनुमान मंदिर परिसरातून रमाई नगर,रेल्वे परिसरालगतच्या पंचशील नगर,हरिनगर,शहरातील महाविर नगर,शास्त्री नगर, मस्तानपुरा परिसर,पोलिस क्वॉर्टर परिसर,अजिझ नगर,कुंभारगल्ली,कोळीवाडा,धनगर वाडा आदी भागांतील रस्ते नाल्यांची दयनीय अवस्था झालेली असून या भागांतील छोट्या मोठ्या नाल्यांची मान्सुनपुर्व तात्काळ स्वच्छता करणे आवश्यक असल्यामुळे नगर परिषदेचे प्रशासक सुधीर पाटील व मुख्याधिकारी अजय नरळे यांनी जवाबदारीचे भान ठेवून शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देऊन स्वतःच्या देखरेखीखाली स्वच्छता विभागा मार्फत शहरात स्वच्छता मोहीम राबवावी ज्याने करून शहरात डेग्यू,मलेरीया,गेस्टो,काविळसह साथीच्या आजार फैलणार नाहीत
मान्सुन अर्थात पावसाळा पुर्व तयारी करण्याच्या अनुषंगाने डेंग्यु हा आजार टाळण्यासाठी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. असे आवाहन नुकतेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व परभणी जिल्हा शासकीय रुग्नालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा आरोग्य अधिकारी परभणी व जिल्हा हिवताप अधिकारी परभणी यांनी केलेले असून त्यांच्या आदेशाची पुर्णा नगर परिषद प्रशासनाने तात्काळ अंमलबजावणी करून शहरातील सर्वच भागांतील लहाण मोठ्या नाल्यांची स्वच्छता व दुरूस्तीसह शहरातील विविध भागातील साचलेल्या कचऱ्यांच्या ढिगारांची विल्हेवाट लावावी नसता शहरात साथींचे आजार फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही...
0 टिप्पण्या