💥पुर्णेत राष्ट्रविर महाराणा प्रतापसिंहजी यांच्या ४८२ व्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन...!


💥राष्ट्रविर महाराणा प्रतापसिंहजी यांच्या प्रतिमेची दि.०२ जुन रोजी सायं.०४-०० वाजता ढोल ताशांच्या गजरात निघणार मिरवणूक💥

पुर्णा (दि.२९ मे २०२२) - येथील क्षत्रिय राजपूत समाज व राष्ट्रविर  महाराणा प्रतापसिंहजी सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने राष्ट्रविर महाराणा प्रतापसिंहजी यांच्या ४८२ व्या जयंती निमित्त दि.०२ जुन २०२२ रोजी सायं.०४-०० वाजेच्या सुमारास शहरातील जुना मोंढा परिसरातील श्रीराम मंदिर संस्थान येथून भव्य मिरवणूक निघणार असून या मिरवणूकीत तमाम क्षत्रिय समाजासह हिंदु बांधवांसह राजस्थानी समाज देखील मोठ्या संंख्येने सहभागी होणार असून या भव्य मिरवणूकीत सर्व हिंदुधर्मिय बांधवांनी जास्तीतजास्त संख्येने सहभाग नोंदवून या मिरवणूकीची शोभा वाढवावी असे आवाहन  सार्वजनिक राष्ट्रविर महाराणा प्रतापसिंहजी सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष किरणकुमारसिंह ठाकूर,उपाध्यक्ष आनंदसिंह ठाकूर,सचिव गोविंद ठाकूर,सहसचिव पंकज ठाकूर,कोषाध्यक्ष कैलाससिंह ठाकूर यांनी केले आहे... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या