💥परभणीत पोकरा योजनेत परभणी येथे कृषी अवजार बँकेचा शुभारंभ...!


💥बँकेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सामाजीक न्यायमंत्री मा.ना.धनंजय मुंढे यांनी केले आहे💥


नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी अनेक उत्तमोत्तम उपक्रमाची तरतूद आहे. त्याचा लाभ अधिकाधिक शेतकरी बांधवांना मिळवून द्यावा, असे निर्देश सामाजीक न्यायमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मा.ना.धनंजय मुंढे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय,परभणी येथे केले.


 
 जिल्हाधिकारी कार्यालय ,परभणी येथे जागतिक बँक व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात शेती उपयोगी साहित्याचे वाटप,कृषिमिञ कल्पवृक्ष शेतकरी गट,पेडगांव व शिवराजे स्वयंसहायता शेतकरी गट,तुळजापुर अवजार बँकेचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.खासदार डाँ.फौजीया खाँन,संजय जाधव,आमदार राहुल पाटील,आ सुरेशराव वरपुडकर,आ.सौ.मेघनाताई साकोरे बोर्डीकर,आ बाबाजाणी दुर्राणी, जिल्हाधिकारी आंचल गोयल,राजेश काटकर,जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी  विजय लोंखडे,बालासाहेब कदम, बळीराम कच्छवे,प्रसादजी चव्हाण,अतिश नाना गरड,सिध्देश्वर कदम,संतोष पवार,संतोष चोपडे,मुंजाजी भुसारे ,पंढरीनाथ भुसारे,प्रभाकर गरड,गजानन कोल्हे,शिवाजी गरड,भाऊ मोरे,आदी उपस्थित होते.


पोकरा योजना जिल्ह्यातील  गावांत राबवली जाते. या योजनेत वैयक्तिक लाभाच्या अनेक उत्तम योजना आहेत. ठिबक, तुषार संचाप्रमाणेच शेडनेट हाऊस, पॉलिग्रीनहाऊससारख्या चांगले अनुदान असलेल्या योजनांचाही लाभ शेतकरी बांधवांना मिळाला पाहिजे. त्यासाठी शेतकरी बांधवांना वैयक्तिक योजनांचाही लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे.समाजातील शेवटच्या माणसापर्यंत योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे,असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

आमदारांकडून ट्रॅक्टरचे सारथ्य – योजनेद्वारे शेतकरी बांधवांसाठी ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याची प्रथम चाचणी यावेळी आमदार डाँ.राहूल पाटील यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवून घेतली. ट्रॅक्टरचे स्टेरिंग हाती घेत पालकमंत्र्यांनी अवजार बँकेच्या आवारात ट्रॅक्टर चालवला. कृषी क्षेत्रात आवश्यक तंत्रज्ञान, अद्ययावत साधने उपलब्ध करून देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 

जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी  60 टक्के अनुदानावरील अवजार बँकेचा लाभ घ्यावा 9975414160

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या