💥पूर्णा शहरात जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्साहात साजरी...!


💥यावेळी जगतज्योती जगतगुरू महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची शहरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली💥


पुर्णा (दि.०३ मे २०२२) - जगतज्योति महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती आज मंगळवार दि.०३ मे २०२२ रोजी पूर्णा शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी जगतज्योती जगतगुरू महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची शहरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती.


          श्री गुरू बुद्धि स्वामी मठ संस्थान येथून सकाळी महात्मा बसवेश्वर महाराज की जय च्या जयघोष करीत शोभयात्रेस प्रारंभ झाला.शहरातील मुख्य मार्गावरून मार्गस्थ होत महात्मा बसवेश्वर महाराज चौक या ठिकाणी शोभा यात्रेची सांगता झाली. महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून  अभिवादन करण्यात आले. 

        या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम,सुधाकर खराटे, नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष  एकलारे,प्रमोद एकलारे,पो.नि.सुभाषचंद्र मारकड,शहरप्रमुख मुंजा कदम,नगरसेवक ॲड.राज भालेराव, नितीन कदम,जगदीश जोगदंड,रमेश एकलारे,भाजपा चे लक्ष्मीकांत कदम, डॉ अजयसिंह ठाकूर,महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीनिवास तेजबंद ,विश्वनाथ होळकर,शरद कापसे,शिवा भालेराव,पत्रकार संघटनेचे शहराध्यक्ष केदार पाथरकर,संभांआणा धुळे,इंजिनियर नागेश कापूस करी आदी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या