💥जिंतूर येथे आज झालेल्या रक्तदान शिबिरात पंचावन्न रक्तदात्यांनी केले रक्तदान....!


💥जिल्हा समग्र शिक्षा व तालुका सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबीराचे आयोजन💥

जिंतूर प्रतिनिधी /  बि.डी.रामपूरकर

जिंतूर (प्रतिनिधी) : जिंतूर ग्रामीण रुग्णालयात सोमवार दि. २३ मे रोजी जिल्हा समग्र शिक्षा व तालुका सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने थॅलेसेमिया रुग्णांसाठी आयोजित रक्तदान शिबीरात एकुण ५५ जणांनी रक्तदान केले.

 जिंतूर शहरातील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य विभाग व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. ग्रामीण रुग्णालय येथील डॉ.रविकिरण चाडगे, गटसाधन केंद्रातील गट शिक्षण अधिकारी सुभाष आमले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.अर्चना भायकर, डॉ.प्रशांत बामणे, विनोद राठोड, अशोक घुगे, मंदा वसावे, अनिल सावंत, समीर दरगु, स्वाती गिरी, बेग मिर्झा, बालाजी वाळे, बालाजी नेटके तसेच परभणी जिल्हा ब्लड बँक अधिकारी अनिल सावंत, सचिन पवार, विठ्ठल शिंदे, मारोती, संतोष टेकाळे, थॅलेसेमिया रुग्णांच्या पालकांसह शिक्षण विभागातील काही कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. अशा प्रकारच्या शिबीरास रक्तदात्यांनी वारंवार उत्स्फुर्त प्रतिसाद द्यावा असे गट शिक्षण अधिकारी आमले व आरोग्य अधिकारी चांडगे यांनी नागरिकांना आवहान केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या