💥वृक्ष कत्तलीचा निषेधार्थ वटवृक्षाचे धार्मिक पद्धतीने जलपूजन व जल अभिषेक...!


💥जिंतूर येथील झाड फाउंडेशन व जागरूक नागरिक मंचाच्या वतीने वृक्ष कत्तलीचा निषेध💥

जिंतूर  प्रतिनीधी / बी.डी.रामपूरकर

जिंतूर : तालुक्यातील चारठाणा ते पिंपरी या साडेचार कि.मी. अंतर दरम्यान असणाऱ्या ऐतिहासिक वारसा व पुरातन संस्कृतीचा वारसा नैसर्गिक वारसा लाभलेल्या महाकाय वटवृक्षाची महामार्ग रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली बेसुमार सुरू असणाऱ्या राष्ट्रीय वृक्ष वडाच्या कत्तली विरोधात आज दि.१४ रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जिंतूर येथील झाड फाउंडेशन व जागरूक नागरिक मंचाच्या वतीने वृक्ष कत्तलीचा निषेधार्थ वटवृक्षाचे धार्मिक पद्धतीने जलपूजन व जल अभिषेक करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी दोन्ही संस्थेचे पदाधिकारी व जागरूक नागरिक उपस्थित होते.

            जिंतूर-जालना राज्य रस्ता क्रमांक- ७५२ वर चारठाणा ते पिंपरी या साडेचार कि.मी. अंतरा दरम्यान राष्ट्रीय वृक्षांची इतिहासिक गर्दी व महाकाय अशी पन्नासावर झाडे आहेत. रुंदीकरणासाठी ही महाकाय झाडे तोडून त्याचे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु सुरुवातीपासूनच झाड फाउंडेशन व जागरूक नागरिक मंचाने विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल  करण्यात येऊ नये अशी भूमिका घेतली आहे. सिने अभिनेता सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून या महाकाय वटवृवृक्षांना तोडून त्याचे इतरत्र प्रत्यारोपण करण्यासाठी स्वतः सयाजी शिंदे पुढाकार घेत आहेत. परंतु जागरूक नागरिक मंच व झाड फाउंडेशनने सयाजी शिंदे यांच्या या भूमिकेला विरोध केला आहे. परभणी जिल्हा अधिकारी यांना याबाबत निवेदन सादर करुन वटवृक्षाची कत्तल थांबवण्यासाठी पर्यायी उपाययोजना करून रस्ता रुंदीकरण करावे असे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या