💥कमी कालावधीत येणाऱ्या पिकांतून शेतकऱ्यांनी आपली आर्थिक प्रगती साधावी...!


💥श्री.स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्राचे संचालक नंदकिशोर कारले यांनी केले आवाहन💥

ताडकळस/प्रतिनीधी 

ताडकळस येथुन जवळच असलेल्या पाथरा ता.जि.परभणी येथील सय्यद जुनेद सय्यद मोहम्मद भाई राहणार पाथरा यांच्या शेतात नॅशनल हायटेक सीड्स गुजरात व श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र लिमला यांच्या संयुक्त विद्यमाने टरबूज पिक पाहणी व शेतकरी सन्मान सोहळा आयोजित केला होता .

यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नॅशनल हायटेक सीड्स गुजरात चे एमडी इरफान खान हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सिंगणापुर येथील प्रगतिशील शेतकरी एकनाथरावजी साळवे  ,हेमंत जळकोटे ,ताडकळस पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जवळेकर(स्वामी) ,पत्रकार शिवाजी शिराळे ,मदनराव आंबोरे ,जनार्दन आवरगंड हे होते . 

या कार्यक्रमास आसपास च्या एकूण २० ते २२ गावातील टरबूज उत्पादक तसेच भेंडी उत्पादक शेतकरी ३५० ते ४०० च्या आसपास उपस्थित होते प्लॉट पाहणीनंतर सुलतान ८८६  या टरबूज वानास शेतकऱ्यांनी चांगली पसंती व्यक्त केली यावेळी शेतकरी बळीराम पुंड ,विलास वाघमारे ,विष्णु सिनगारे ,शंकर सिनगारे, धोंडीराम लाड ,प्रदीप जोगदंड बाळासाहेब सिनगारे आदी शेतकऱ्यांचा सन्मान यावेळी नॅशनल हायटेक सीड्स गुजरात व श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र यांच्या वतीने करण्यात आला... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या