💥ग्रामीण भागात शंभर रुपयात मिळालेल्या उज्वला योजनेच्या कनेक्शनने शंभर दिवसात टाकली मान खाली💥
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना गोरगरीब जनसामान्यांना या योजने अंतर्गत केवळ १०० रुपयात गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यात आले खरे परंतु यातील असंख्य लाभधारकांना कनेक्शन मिळाल्यानंतर मात्र पुन्हा गॅस सिलेंडर भरून घेण्याची हिंमत झाली नाही कारण पहाता पहाता गॅसचे दर हजार रुपयांचा आकडा पार करून गेले त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांचे गॅसवर स्वयंपाक करण्याचे स्वप्न पाहता पाहता भंगले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गोरगरीब जनसामान्यांसाठी अंमलात आणलेली प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या प्रचंड दरामुळे संपुर्णतः फोल ठरली असून या योजनेतील असंख्य लाभार्थ्यांनी पुन्हा चुलीकडे आपला मोर्चा वळवून प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनाच चुलीत घालत सिलेंडरसह मिळालेल्या शेगड्यांची देखील भंगार भावात विक्री केल्यामुळे या योजनेतील हजारो गॅस सिलेंडर हॉटेल रेस्टॉरंट धाबे चाट भांडारच्या गाड्यांवर दिसू लागले आहेत.
पुर्णा तालुक्यात प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे एकून ३८४२ लाभार्थी असून यात शहरी भागात ८१६ लाभधारक तर ग्रामीण भागात ३०२६ लाभधारक आहेत परंतु संबंधित लाभार्थ्यांपैकी अल्पशः लाभार्थी वगळता उर्वरीत लाभार्थ्यांची कनेक्शन असून नसल्यागत झाल्याचे निदर्शनास येत असून संबंधित योजनेतील लाभार्थ्यांची यादी तसेच नावा संदर्भात तसेच यातील किती लाभार्थी या योजनेचा पुरेपूर लाभ घेत आहेत या संदर्भात पुर्णा गॅस एजंन्सी धारक जि.एस.आहेर यांना विचारणा केली असता या संदर्भात आम्हाला माहिती देता येत नाही तसेच लाभार्थ्यांच्या यादीसह यातील किती लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत याची सुध्दा माहिती देता येत नाही म्हणून उडवाउडवीची उत्तर देत असल्यामुळे शंकेची पाल चुकचूकतांना दिसत असून या योजनेतील असंख्य गॅस सिलेंडर शहरी भागासह ग्रामीण भागातील देखील हॉटेल रेस्टॉरंट धाबे हातगाड्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडे दिसत असल्यामुळे प्रचंड वाढलेल्या गॅस सिलेंडरच्या दरामुळे या योजनेचा लाभ घेण्यास असमर्थ ठरलेल्या लाभार्थ्यांकडील सिलेंडरचा पुरेपूर लाभ व्यवसाईक घेत असल्यामुळे व्यवसायिक सिलेंडर घेणाऱ्यांची संख्या घटल्याचे दिसत आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उज्वला गॅस योजनेचा शेवट अखेर 'चुलीत' झाल्याचे निदर्शनास येत आहे.....
0 टिप्पण्या