💥मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी : नॉन बेलेबल वॉरंट काढण्याचं कारण काय ? जाणून घ्या...!


💥सांगली जिल्ह्यातील शिराळा मे.कोर्टाकडून राज ठाकरेंना पकडण्याबाबतचं वॉरंट जारी💥

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आलंय ६ एप्रिल २०२२ रोजी हे वॉरंट राज ठाकरे यांच्याविरोधात जारी करण्यात आलेलं होतं मात्र त्यांच्यावर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही ? अससा प्रश्न मे.कोर्टानं आता पोलिसांना उपस्थित केला आहे हे प्रकरण आहे. 

* प्रकरण सांगली जिल्ह्यातलं :-

सांगली जिल्ह्यातील शिराळा मे.कोर्टाकडून राज ठाकरेंना पकडण्याबाबतचं वॉरंट जारी करण्यात आलं होतं २८ एप्रिल २०२२ रोजी जारी करण्यात आलेलं हे पत्र आता समोर आलं आहे राज ठाकरेंवर १४३, १०९, ११७ अशी कलमं लावण्यात आली आहे २००८ सालच्या एका प्रकरणात राज ठाकरेंविरोधात हे वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे राज ठाकरेंविरोधात जारी करण्यात आलेलं वॉरंट हे अजामीनपात्र आहे. 

त्यामुळे राज ठाकरेंना या वॉरंटमुळे कोणत्याही प्रकारचा जामीन मिळण्याची शक्यता नाही शिराळ्यातील मे. न्यायदंडाधिकाऱ्यांनी हे वॉरंट जारी केलं आहे २००८ सालच्या प्रकरणात जारी करण्यात आलेल्या वॉरंटमध्ये राज ठाकरेंवर आतापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती दहा पेक्षा जास्त वर्ष जुनं असलेल्या या प्रकरणात आता विशेष हवालदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. अनावश्यक गर्दी करण्यासोबत इतरही अनेक कायद्यांचं उल्लंघन केल्याचा आरोप राज ठाकरेंवर करण्यात आला आहे.

*वातावरण तापलं :-

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरुन आक्रमक भूमिका घेतली आहे औरंगाबादमधील सभेत त्यांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिला होता दरम्यान, शिराळा मे.कोर्टानं जुन्या प्रकरणात जारी केलेल्या वॉरंट जारी केलंय याआधीदेखील राज ठाकरेंविरोधात वॉरंट जारी करण्यात आलेलं होतं तेव्हा ते चौकशीला हजर राहिले नव्हते जामीन दिल्यानंतरही राज ठाकरे दिलेल्या तारखेला हजर न राहिल्यानं अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आलेलं होतं.

सुरक्षेत वाढ :-

दरम्यान, राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी मुंबई पोलिसांकडून खबरदारी बाळगली जाते आहे राज ठाकरेंनी सोमवारी ट्वीट करत आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं ईदच्या पार्श्वभूमीवर त्यांना कार्य़कर्त्यांना आवाहन केलं होतं. आज पुन्हा ते ट्वीट करत आपल्या कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण संदेश देणार आहेत ४ मे २०२२ पासून मशिदींवरील भोंग्यांना हनुमान चालिसेने उत्तर देण्याचा इशारा राज ठाकरे यांनी औरंगाबादेतील सभेतून दिला होता त्या नंतर आता आज राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात ? हे पाहणंही महत्त्वाचंय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या