💥काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव सुरेश नागरे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी....!


💥जिंतूर काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश काजळे पाटील यांची मागणी💥

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

जिंतूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी  २० जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे प्रदेश सचिव सुरेश नागरे यांना पक्षाकडून संधी देण्यात यावी, अशी मागणी तालुकाध्यक्ष गणेश काजळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.

         जिंतूर- सेलू मतदारसंघासह जिल्ह्यात यापूर्वीच बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत सुरेश नागरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांनी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष बळकटीसाठी सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपा कार्यकर्त्यांची काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरू ठेवली. काही बोर्डीकर समर्थक नगरसेवकांसह राष्ट्रवादीचे जि.प. सदस्य नागरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसवाशी झाले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेश सचिव सुरेश नागरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते निवडणुकीसाठी सज्ज झाल्याचेही गणेश काजळे यांनी सांगितले. यातूनच विकासासाठी सुरेश नागरे यांना विधान परिषदेसाठी काँग्रेस पक्षाने उमेदवारी देण्याची मागणी गणेश काजळे, नानासाहेब राऊत, प्रदेश उपाध्यक्ष केशवराव बुधवंत, माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, अविनाश काळे, राजेंद्र नागरे, नगरसेवक टीकाखान पठाण, रहेमान लाडले, नागसेन भेरजे, कृष्णा राऊत, प्रदीप चव्हाण, बासू खा पठाण, डॉ. निशांत मुंढे, रावसाहेब खंदारे, लखन कुरे आदींनी केली.

मागील विधानसभा निवडणूक सुरेश नागरे यांनी शिवसेना आ. डॉ. राहुल पाटील यांच्या विरोधात लढवून जिल्ह्याचे लक्ष वेधले होते. काँग्रेसने त्याचवेळी नागरे यांना उमेदवारी दिली असती तर वेगळे चित्र पाहावयास मिळाळे असते, अशी खंतही गणेश काजळे यांनी व्यक्त केली. त्यावेळी • काँग्रेसने रवीराज देशमुख यांना उमेदवारी बहाल केली होती. त्यावेळेस न दिलेल्या उमेदवारीची उणीव यावेळी काँग्रेसच्या कोठ्यातील विधान परिषदेची उमेदवारी देऊन भरून काढावी व एका ओबीसी चेहऱ्यास बळ द्यावे अशी मागणी केली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या