💥हिंगोलीत महाआरती हिंगोली मधील मनसेच्या शंभर पदाअधिकारी कार्यकर्त्यांना नोटिसा...!


💥कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणल्यास होणार कारवाई💥 

शिवशंकर निरगुडे : हिंगोली प्रतिनिधी 

सध्या पूर्ण महाराष्ट्र भर मशिदी वरचे भोंगे उतरवा असे आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रशासनाला दिले होते भोंगे नाही उतरवले तर दुप्पट आवाजात हनुमान चालीस लावावी असे आव्हान कार्यकत्याना देण्यात आले होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करत आज हिंगोली मधे महाआरती घेण्यात आली. 

हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शंभर पदअधिकाऱ्याना व कार्यकर्त्यांना पोलिस विभागाच्या वतीने नोटिसा दिल्या आहेत कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणल्यास कार्यवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहें सध्या राज्यात राजकीय वातावरणात चांगलेच तापले आहें एकीकडे हनुमान चालीसा तर दुसरीकडे भोंगे यावरून वातावरणात तापलेले आहें महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी दि 4/05/2022 ला महाआरती तसेंच हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिले आहेत या पार्श्र्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस अधिक्षक राकेश कलासागर .सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीस देशमुख अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांनी तातडीने ठाणेदार यांच्या बैठका घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत या शिवाय जिल्हात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शंभर कार्यकर्त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत यामध्ये ध्वनीक्षपकाचा वापर करतांना त्यासाठी दिलेल्या नियमाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेंच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कडक कारवाई करण्याचा ईशाराहि देण्यात आला आहें हिंगोली शहरातील धडवाई हनुमान मंदिरात मनसेच्या जिल्हा प्रमुख प्रमोद उर्फ बंडू कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि .04/05/2022 रोजी सकाळी महाआरती व हनुमान चालीसाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मनसेचे शहरात प्रमूख संतोष बांगर .संतोष खंदारे .विशाल इंगळे युवा जिल्हाअध्यक्ष रवि मुदीराज औंढा नागनाथ तालुका अध्यक्ष दीपक सांगळे विठ्ल जाधव कृष्णा पवार ज्ञानेश्वर वीरकर संजय कोकाटे गजानन सरकटे पुर्थ्वीराज चव्हान यांच्या मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या