💥चिखलीत श्री.परशुराम जन्मोत्सवा निमित्त शोभा यात्रेचे आयोजन...!


💥शोभायात्रा मिरवणूक श्री राम मंदिर रामदासी आदर्श विद्यालय जवळ येथून सायंकाळी ५ वाजता प्रारंभ होईल💥

 ✍️ मोहन चौकेकर

 चिखली : राजराजेश्वर भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने चिखली शहरांमध्ये आज मंगळवार दि. ३ मे रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेमध्ये सर्वशाखीय, बहुभाषिक ब्राह्मण समाजातील बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने निघणारी ही शोभायात्रा मिरवणूक श्री राम मंदिर रामदासी ( आदर्श विद्यालय जवळ ) येथून सायंकाळी ५ वाजता प्रारंभ होईल. जुने गाव श्री गणपती मंदिर मार्गे चिंच परिसर, सिमेंट रोड, जयस्तंभ चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, तेथून पुन्हा जयस्तंभ चौक व राजा टाँवर परिसर यामार्गे वाजत गाजत ही शोभायात्रा श्री रेणुकादेवी मंदिरामध्ये पोहोचेल. तेथे सामूहिक महाआरतीद्वारे या शोभायात्रेचा समारोप करण्यात येईल. आज पहाटे ५ वाजता भगवान श्री परशुराम यांच्या मूर्तीला श्री रेणुकादेवी मंदिरामध्ये महाभिषेक देखील करण्यात आला. या सर्व आयोजनामध्ये चिखली शहरातील सर्वशाखीय, बहुभाषिक ब्राह्मण बंधू-भगिनींनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन चिखली शहरातील भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.....                                

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या