💥नांदेड गुरुद्वारा बोर्डाचा कार्यकाळ संपल्यामुळे गुरूद्वारा बोर्ड बरखास्त करून प्रशासकीय समितीची नेमणूक करण्यात यावी...!


💥राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा खा.शरदचंद्र पवार यांच्याकडे स.मनबीरसिंघ ग्रंथी यांनी निवेदनाद्वारे केली मागणी💥 

नांदेड (दि.15 मे 2022) :- राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब हे काल शनिवार दि.14 मे 2022 रोजी नांदेड दौऱ्यावर आले असताना नांदेड गुरुद्वारा बोर्डाचा कार्यकाळ संपल्यामुळे व बोर्ड कायद्याप्रमाणे काम करत नसल्यामुळे बोर्डाला शोखास नोटीस देऊन गुरुद्वारा बोर्ड बरखास्त करावे व नवीन गुरुद्वारा बोर्ड गठीत होईपर्यंत प्रशासकीय समितीची नेमणूक करण्यात यावी यासाठी  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जिंतूर-गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक स. मनबीरसिंघ ब्रिजपालसिंघ ग्रंथी यांनी देशाचे नेते खासदार शरदचंद्र जी पवार साहेब, राज्याचे ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब,  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेब यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आला.

नांदेड गुरुद्वारा बोर्डाचा कार्यकाळ मागील 8 मार्च 2022 रोजी संपला असून गुरुद्वारा बोर्डाच्या पदाधिकार्‍यांमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व इतर सदस्य यांच्यामध्ये बेबनाव झाल्यामुळे गेल्या दीड वर्षां नांदेड गुरुद्वारा बोर्डाची बैठक झाली नाही, त्यामुळे गुरुद्वारा बोर्डाचे बजेट सुद्धा पास करण्यात आलेले नाही. स्थानिक सदस्य व अधीक्षक गुरविंदरसिंघ वाधवा हे बेकायदेशीर कामे करत आहेत. त्यामुळे गुरुद्वारा बोर्डाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. बेकायदेशीर कामे केल्यामुळे स्थानिक सदस्य व अधीक्षक गुरविंदरसिंघ वाधवा यांची समाजामध्ये प्रतिमा मलीन झाली आहे. बोर्डाचे कर्मचारी सुद्धा स्थानिक सदस्य व अधीक्षक गुरविंदरसिंघ वाधवा यांचे आदेश ऐकायला तयार नाही. या बेबनावामुळे येणार्‍या भाविकांवर परिणाम झाला आहे, त्यामुळे गुरुद्वारा बोर्डाचे उत्पन्न घटले आहे. ही सर्व परिस्थिती पाहता महाराष्ट्र शासनाने नांदेड गुरुद्वारा बोर्ड बरखास्त करून नवीन गुरुद्वारा बोर्डाचे गठन होईपर्यंत नांदेड येथील स्थानिक समाजामधून प्रशासकीय गुरुद्वारा बोर्ड समितीची नेमणूक करण्यात यावी ही मागणी करण्यात आली....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या