💥ताडकळस येथे ग्रामिण ईमारत कारागिर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन...!


💥दुसऱ्या दिवशी प्रत्यक्षात सराव तर तिसऱ्या दिवशी परीक्षा असा कार्यक्रम राबवीला जाईल💥

ताडकळस (दि.25 मे 2022) - प्रथम एज्युकेशन फांऊंडेशन या स्वंसेवीसंस्थेमार्फत मौजे ताडकळस येथे ग्रामिण भागातिल ईमारत बांधकामगारासाठी तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले. यात पहिल्या दिवशी पुस्तकीय माहिती प्रशिक्षण दुसऱ्या दिवशी प्रत्यक्षात सराव तर तिसऱ्या दिवशी परीक्षा असा कार्यक्रम राबवीला जाईल. 

याठिकाणी बांधकामगाराना भार वाहकघरांना आपत्तीप्रतीरोधक अधिकाधिक मजबुत करण्यासाठी आभियांञीकी दृष्ट्या योग्य अधिकाधिक मार्गदर्शन करण्यात आले याबरोबरच कमी खर्चात ऊच्छ प्रतीची ईमारत कशी बांधतायेईल याविषयी सविस्तर मार्गदर्शन संस्थेचे प्रशिक्षक ईस्माईल तंटे यांनी ऊपस्तीत कारागिरांना केले.व ग्रामिण भागातील वाढती बेरोजगारी कश्या प्रकारे दुर करता येईल या विषयी विविध व्यवसायिक प्रशिक्षणाची माहिती गजानन सुरवसे यांनी दिली.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते पठाण शमिम,पञकार सुरेश मगरे आदीनी सहकार्य केले.या वेळी सय्यद महेबूब, चंद्रकांत मगरे, बबन खटिंग ,माजीद पठाण, शेख युनूस, लिंबाजी हजारे ,संदीप होनमाने, शरीफ पठाण, राजुशेख ,चांद शेख, चांद शेख ,ताजुद्दीन शेख, मंचक मगरे आदींनी प्रशिक्षण घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या