💥पुर्णा तालुक्यात महसुल प्रशासन बिनघोर,रेती घाट लिलावधारक/तस्कर शिरजोर ; गावकऱ्यांसह शेतकऱ्यांच्या जिवाला मात्र घोर....!


💥पुर्णा-गोदावरी नदीपात्रांवर रात्रंदिवस अनिल..बाबा चाळीस चोरांचा जेसीबी मशीनने रेती उत्खनन करीत धुमाकूळ💥 

पुर्णा (दि.०९ मे २०२२) - पुर्णा तालुक्यात महसुल प्रशासन बिनघोर...रेती घाट लिलावधारक रात्रंदिवस बेकायदेशीरपणे जेसीबी पोकलेन मशीनच्या साहाय्याने चोवीस तास हजारो ब्रास अवैध रेतीचे उत्खनन करून झाले शिरजोर अन् परिसरातील गावकरी/शेतकऱ्यांच्या जिवाला मात्र घोर अशी एकंदरीत परिस्थिती तालुक्यातील रेती घाटांची झाली असून ' रेती घाट लिलावधारक म्हणतात दाम करी काम महसुल प्रशासनातील भ्रष्टाचाऱ्यांना रेती घाटच झाले चारोधाम' मग महसुल प्रशासनाच्या नियमांची राजरोसपणे पायमल्ली केली काय किवा महसुल प्रशासनाच्या नियमांवर लघुशंका केली काय आमच कोण काय बिघडवणार ? असा प्रश्न जनसामान्यासह मिडिया समोर उपस्थित करणाऱ्या रेती घाट लिलावधारक/रेती तस्करांची मुजोरी किती वाढली आहे याचा अंदाज यावरून सहजच काढता येतो.


पुर्णा तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदीपात्रावरील पिंपळगाव बाळापूर,कानखेड,कान्हेगाव,निळा,संदलापूर,मिठापूर,देवठाणा,खरबडा,मुंबर,वझूर आदी रेती घाटांचा लिलाव झाला असून यातील अर्धे रेती घाट फेब्रुवारी महिण्यातच सुरू झाले असून उर्वरीत रेती घाटांना अवघ्या काही दिवसांपुर्वी सुरूवात झाली आहे संबंधित रेती घाट लिलावधारकांनी महसुल प्रशासनाच्या नियमाप्रमाणे आपआपल्या रेती घाटांवर मनुष्यबळाचा अर्थात रोजमजुरांकडून सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत सिसीटीव्हीद्वारे चित्रण करून ठराविक क्षेत्रातून रेती उत्खनन करणे बंधनकारक असतांना तसेच लिलावधारकाने कुठल्याही प्रकारे भागीदारी अर्थात व्यवसायिक पार्टनरशीप न करता स्वतः रेतीघाट चालवने बंधनकारक असतांनाही संबंधित रेतीघाट लिलावधारक महसुल प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली करीत रेती घाटांवर अवैधरित्या नियमबाह्य पध्दतीने रात्रंदिवस जेसीबी/पोकलेन मशीनची वापर करीत बिना सिसीटीवी चित्रणाचे स्वतः व नियमबाह्य भागीदारांकडून प्रतिरोज हजारो ब्रास निर्धारीत क्षेत्रासह नदीपात्रातील अन्य क्षेत्रातून ही रेती उत्खनन करीत असतांना स्थानिक रेती घाट गावातील सरपंच/ग्रामविकास अधिकारी,मंडळ अधिकारी तलाठी आर्थिक लोभाला बळी पडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असतांना तहसिलदार टेमकर,नायब तहसिलदार यांच्यासह विभागीय अधिकारी सुधीर पाटील हे देखील अक्षरशः डोळेझाक करून तुका म्हणे उभे राहावे जे जे होईल ते ते पहावे...अश्या प्रकारे वेळकाढू धोरणाचा अवलंब करीत असल्यामुळे संबंधित रेती घाट लिलावधारक चतूर कोल्ह्याप्रमाणे मुळासकट उस खाल्ल्याप्रमाणे रेती घाटासह आसपासचा संपूर्ण परिसर पोकलेन मशीनच्या साहाय्याने पोखरून काढतांना दिसत असून जिल्हाधिकारी गोयल यांनी तात्काळ तालुक्यातील रेती घाटांची ईटीएसद्वारे मोजनी करून संबंधित रेतीघाट धारकांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी होत आहे. 

💥अरे आपणे जिगरपर बना हूं मैं....किसी मिनिस्टरने नही बनाया मेरे को...मुजोर रेती घाट लिलावधारकाची अशी ही मुजोरी ?


अरे आपणे जिगरपर बना हूं मैं....किसी मिनिस्टरने नही बनाया मेरे को....असे छाती ठोकून तालुक्यातील पुर्णा नदीपात्रावरील कानखेड/निळा रेतीघाट खुलेआम रात्रंदिवस जेसीबी मशीनच्या साहाय्याने अक्षरशः खरडून काढणाऱ्या रेती लिलावधारक अग्रवालने अहंकाराच्या आवेशात विडिओ सोशल मिडियावर व्हायरल करून जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे व प्रशासनासह मिडियाला तर दम तर दिला नाही ना ? कारण जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आ.बाबाजानी दुर्रानी यांनी नुकतीच पाथरी तालुक्यातील डाकू पिंपरी येथील रेती घाटाची तक्रार पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा.ना.धनंजय मुंडे यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासनाची कान उघडणी केली त्यामुळे जिल्हाधिकारी गोयल यांना डाकू पिंपरी रेती घाटाच्या चौकशीचे आदेश द्यावे लागले सदरील घटनेमुळे जिल्ह्यातील अधिकृत रेती घाट लिलावधारकांमध्ये खळबळ माजली जिल्ह्यातील महसुल प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या खंबीर पाठबळामुळे रेतीघाट लिलावधारक कश्या पध्दतीने जिल्ह्यात मुजोरी करत रात्रंदिवस जेसीबी मशीनींच्या साहाय्याने हजारो नव्हे लाखो ब्रास रेतीचे बेकायदेशीरपणे उत्खनन करीत प्रशासनासह प्रसार माध्यमांवर कुरघोडी करीत आहेत याचे जिवंत उदाहरण म्हणजे पुर्णा तालुक्यातील पुर्णा नदीपात्रावरील मौ.कानखेड/मौ.निळा या दोन रेतीघाटांचा लिलावधारक अग्रवाल आता सोशल मिडियावर आपल्या व्यवसायिक भागीदारांना सोबत घेऊन 'वास्तव' सिनेमातील गुंडाची भुमिका करणाऱ्या संजय दत्त प्रमाणे डायलॉगबाजी करीत धमकावण्याचा तर प्रकार करीत नाही ना ? असा गंभीर प्रश्न प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसह जनसामान्यांमध्ये उपस्थित होत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या