💥पुर्णा तालुक्यात रमजान ईदसह अन्य सनांवर चिथावणीखोर राजकारण्यांच्या चिथावणीचा यत्किंचितही असर नाही...!


💥शहरात रमजान ईदसह महात्मा बसवेश्वर जयंती अक्षयतृतिया सनांचा सर्वत्र उत्साह ; नागरिकांनी एकमेकांना दिल्या शुभेच्छा💥


पुर्णा (दि.०३ मे २०२२) : पुर्णा शहरात आज मंगळवार दि.०३ २०२२ रोजी मुस्लिम बांधवांची रमजान ईदसह जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती व भगवान पशुराम जयंती तसेच हिंदु धर्मियांचा पवित्र सन अक्षयतृतीया असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले विरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक जगतज्योती जगतगुरू महात्मा बसवेश्वर यांची जयंती असल्यामुळे आज सकाळी ०९-०० वाजेच्या सुमारास विरशैव लिंगायत समाजाच्या वतीने शहरातील श्री गूरू बुध्दीस्वामी मठ संस्थान येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती सदरील मिरवणूकीत विरशैव लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरील मिरवणूक विर शिरोमनी महाराणा प्रताप चौक दत्तनगर संत नरहरी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जगतगुरू जगतज्योती महात्मा बसवेश्वर चौकात आल्यानंतर महात्मा बसवेश्वर यांच्या नियोजित पुतळा स्थळावरील महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजा अर्चना करण्यात आली या ठिकाणी मिरवणूकीची सांगता झाली तर मुस्लीम बांधवांची रमजान ईद असल्यामुळे मुस्लीम बांधवांनी शहरातील इदगाह मैदान येथे ईद-उल-फित्रची सामुहीक नमाज मौलाना शेख आवेज रजा साहब यांच्या मार्गदर्शना खाली अदा केली या सामुहीक नमाज नंतर मुस्लीम बांधवांसह सर्वधर्मिय बांधवांशी यावेळी एकमेकांना रमजान ईदसह महात्मा बसवेश्वर जयंती भगवान परशुराम जयंती व अक्षयतृतीयाच्या शुभेच्छा देत चिथावणीखोर राजकारण्याच्या चिथावणीला मुठमाती देत सर्व धर्मिय समाज बांधवांनी आपआपले सन उत्साहपुर्वक वातावरणात व अत्यंत शांततेत साजरे करीत राष्ट्रीय एकात्मतेसह बंधुभाव जोपासल्याचे निदर्शनास आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या