💥वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आर्थिक हितसंबंध जोपासत ग्रामपंचायत प्रशासनातील भ्रष्ठ अनागोंदी कारभारावर टाकला पडदा💥
पुर्णा (दि.१२ मे २०२२) - तालुक्यातील गौर ग्रामपंचायतचा नागरी सुविधा पुरवण्यात संपुर्णतः अपयशी ठरल्यानंतर देखील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात औरंगाबाद विभागातून तिसरा क्रमांक काढणाऱ्या विभास्तरीय तपासणी समितीच्या कार्यक्षमतेसह विश्वासार्हतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला असून सदरील समितीतील अधिकारी/कर्मचाऱ्यांनी संबंधित भ्रष्ट ग्रामपंचायत प्रशासनाशी आर्थिक हितसंबंध जोपासत औरंगाबाद विभागातून तिसरा क्रमांक काढला असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहे.
तालुक्यातील गौर ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना अंतर्गत विभागस्तरीय तपासणी समितीने दि.१९ एप्रिल २०२२ रोजी भेट देऊन संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात गौर ग्रामपंचायतीला सन २०१९/२० अंतर्गत औरंगाबाद विभागातून तिसरा क्रमांक बहाल केला या तपासणीत गावातील पाणी गुणवत्ता तपासणी करण्यात आली परंतु गावातील जनतेचे दुर्दैवच म्हणावे लागेल की गावात कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी आल्यानंतर देखील पाणीपुरवठा योजनाच कार्यान्वित नाही तर मग पाणी गुणवत्ता तपासणी कोणत्या आधारे करण्यात आली ? सदरील समितीने सांडपाणी व्यवस्थापण तपासणी केली परंतु गावात कुठेही सांडपाणी व्यवस्थापण नाही मग सांडपाणी व्यवस्थापणाची तपासणी केली तरी कोणत्या आधारे ? सदरील विभागस्तरीय तपासणी पथकाने गावातील बंदिस्त गटारे आदी निकषांची तपासणी केल्याचेही भासवण्यात आले परंतु गावात बंदिस्त गटाराच्या नावावर निकृष्ट काम करून या जोजनेचाही बट्याबोळ करण्यात आल्याचे दिसत असतांना विभागस्तरीय समितीला बंदिस्त गटारांच्या निकषाची पुर्तता झाल्याचे कुठे ? असे गंभीर प्रश्न ग्रामस्थांमध्ये उपस्थित होत असून संपूर्ण गौर गावात नागरी समस्यांसह पिण्याच्या पाण्यासह सांडपाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतांना संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानच्या विभागस्तर समितीने संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाशी आर्थिक हितसंबंध जोपासत गौर ग्रामपंचायतीचा औरंगाबाद विभागातून बोगस तिसरा क्रमांक देऊन गौर ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट व अनागोंदी कारभाराला एक प्रकारे सन्मानीतच केल्याचे निदर्शनास येत असून गौर ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट व अनागोंदी कारभारा विरोधात गावातील जागृक नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी केल्यानंतर देखील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी तक्रारींची दखल न घेतल्यामुळे गावातील जागृक नागरिक जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे समजते....
💥संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात गौर ग्रामपंचायतचा औरंगाबाद विभागातून तिसरा क्रमांक ?
जनहीताशी बांधिलकी न जोपासता भ्रष्टाचाऱ्यांशी हितसंबध ठेवून वास्तविक परिस्थितीच्या विरोधात धादांत खोटे वृत्त प्रकाशित करण्याचा गंभीर प्रकार एका वृत्तपत्र प्रतिनिधीने केल्यामुळे गौर गावातील ग्रामस्थांमध्ये त्या वृत्तपत्र प्रतिनिधी विषयी संताप व्यक्त होत असून गौर गावातील ग्रामपंचायतीला कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी प्राप्त झाल्यानंतर देखील गावात नागरी समस्यांचा प्रचंड डोंगर उभा टाकला असतांना संबंधित प्रतिनिधीला गावातील विकास झाल्याचे निदर्शनास आले तरी कुठून असा संतप्त प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत....
0 टिप्पण्या