💥मुंबई-गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्या :कोकणातील पत्रकारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे....!

 


💥कोकणातील पत्रकारांनी एस.एम देशमुखांच्या नेतृत्वाखाली २००६ पासून महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी सनदशीर मार्गाने लढा दिला💥

✍️ मोहन चौकेकर

मुंबई : मुंबई - गोवा महामार्गाला आद्य पत्रकार, विचारवंत, समाजसुधारक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे या मागणीसाठी आज कोकणातील पत्रकारांनी एल्गार पुकारला.. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील कर्जत पासून ते सावंतवाडी, मालवण पर्यत २६ तालुक्यातील पत्रकारांनी तहसिलदारांना निवेदनं देऊन बाळशास्त्रींचे नाव महामार्गाला देण्याचे साकडे सरकारला घातले.. 

कोकणातील पत्रकारांनी एस.एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली २००६ पासून महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी सनदशीर मार्गाने लढा दिला होता.. त्यासाठी दिल्ली वारया देखील केल्या गेल्या.. त्यानंतर २०१२ मध्ये महामार्गाचे काम सुरू झाले.. पत्रकार लढत असताना त्याकडे दुर्लक्ष करणारे सर्वपक्षीय राजकीय नेते आज मात्र रस्त्याचे श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहेत.. तसेच या महामार्गासाठी विविध नावं समोर करून कारण नसताना वाद उभा करीत आहेत.. .मात्र हा मार्ग कोकणातील जागरूकआणि लढाऊ पत्रकारांमुळेच पूर्ण झाल्याने महामार्गाला एका पत्रकाराचे नाव देणे उचीत ठरेल असे पत्रकारांना वाटते.. 

 १९० वर्षांपुर्वी दर्पण हे नियतकालिक सुरू करून वृत्तपत्रांचा पाया घालणाऱ्या बाळशास्त्रींचे नाव महामार्गाला द्यावे अशी मागणी त्यातूनच पुढे आली.. बाळशास्त्री कोकणातील तर होतेच त्याचबरोबर ते केवळ पत्रकारच नव्हते तर विचारवंत, समाजसुधारक, भाषाप्रभू म्हणूनही त्यांचा नावलौकिक होता. अशा प्रतिभावंत पत्रकारांचे महामार्गास नाव देऊन आम्ही विचारवंतांची, पत्रकारांची देखील कदर करतो हे सरकारने जगाला दाखवून द्यावे अशी मागणी कोकणातील पत्रकारांनी निवेदनाव्दारे सरकारकडे केली आहे..

एस.एम देशमुख यांनी देखील  मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून सरकारने पत्रकारांची मागणी मान्य करावी अशी विनंती केली आहे. असे न केल्यास राज्यभरातील पत्रकार यासाठी मोठा लढा उभारतील असा इशारा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे नेते एस.एम देशमुख यांनी दिला आहे.. तसेच परिषदेने केलेल्या आवाहनानुसार कोकणातील पत्रकारांनी एकीचे दर्शन घडवत बहुतेक तालुक्यात निवेदनं दिल्याबद्दल देशमुख यांनी कोकणातील पत्रकारांचे आभार मानले आहेत.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या