💥वाशिम येथे शुक्रवार दि.२७ मे रोजी नववे रमाई चळवळीतल्या साहित्य संमेलनाचे भव्यदिव्य आयोजन....!


💥राज्यातील साहित्यकांची भरगच्च उपस्थिती : रमाई स्मृतिदिनानिमित्त उपक्रम💥

फुलचंद भगत

वाशिम - भिमाई आंबेडकर यांचा १२५ वा स्मृतीदिन, बाबासाहेबांची बॅरीस्टर पदवी शताब्दी, राजर्षी शाहु महाराज स्मृती शताब्दी व रमाई स्मृतीदिनानिमित्त रमाई मासिक, रमाई फाऊंडेशन, रमाई प्रकाशन व लोकनेते भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठान औरंगाबादच्या वतीने शुक्रवार, २७ मे रोजी नववे रमाई चळवळीचे साहित्य संमेलन साहित्यीकांची नगरी असलेल्या वाशिम शहरात होवू घातले आहे.

    भव्यदिव्य प्रमाणात होणार्‍या या संमेलनात राज्यभरातुन साहित्यीक, कवी व लेखकांची उपस्थिती असणार असून स्थानिक जैन भवन येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले नगरी अशा नामकरणातून हे संमेलन होवू घातले आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मुंबईच्या प्रसिध्द लेखिका उषा अंभोरे, उद्घाटक म्हणून विद्रोही साहित्यीक चळवळ पुणेचे किशोर ढमाले तर स्वागताध्यक्ष म्हणून सामाजीक कार्यकर्त्या मिनाताई उलेमाले यांची उपस्थिती राहील. या संमेलनामध्ये संविधान सन्मान रॅली, विविध प्रखर विषयावर परिसंवाद, रमाई गौरव पुरस्कार, ठराव वाचन, कवी संमेलन आदी विविध कार्यक्रमाची मेजवाणी रसिकांना मिळणार आहे.

    सकाळी ८ वाजता डॉ. आंबेडकर चौक ते संमेलनस्थळी संविधान सन्मान रॅली काढून भारतीय बौध्द महासभेच्या वतीने बुध्दवंदना घेण्यात येईल. संमेलनाचे उद्घाटन ९ वाजता होत असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमरावतीचे माजी संमेलनाध्यक्ष डॉ. निशा शेंडे, वंचितच्या राज्य उपाध्यक्षा डॉ. गजालाखान, सोलापुरचे माजी संमेलनाध्यक्ष हिरा दया पवार, वंचितच्या राज्य सदस्या सौ. किरण गिर्‍हे, नाशिकच्या डॉ. अरुणा लोखंडे, भारतीय बौध्द महासभा जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ भगत, प्रा. आशालता कांबळे वणंद, वंचितचे जिल्हाध्यक्ष डॉ. गजानन हुले, उर्मिला पवार मुंबई, महासचिव सोनाजी इंगळे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. सिध्दार्थ देवळे, माजी नगराध्यक्ष शेषराव ढोके, डॉ. नरेश इंगळे, डॉ. तुषार गायकवाड, जि.प.सभापती वनिता देवरे, फुले आंबेडकर विव्दत्त सभाचे डॉ. मनोज निकाळजे, अ‍ॅड. एस.आर. बोदडे औरंगाबाद, जेष्ठ कवी प्रा. विजयकुमार गवई औरंगाबाद, प्रा.डॉ. विजय तुरुकमाने रिसोड, जि.प.सदस्या कल्पना राऊत, जेष्ठ सत्यशोधक के.ई. हरिदास औरंगाबाद यांची उपस्थिती राहील. तर कार्यक्रमाचे संचालन कविता मोरवणकर मुंबई व आभारप्रदर्शन दैवशिला गवंदे ह्या करतील.

    दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान भारतीय संविधान बदलण्याचे कटकारस्थान आणि पुरोगामी चळवळीची भूमिका या विषयावर परिसंवाद होईल. यावेळी अध्यक्षस्थानी प्रा. आशालता कांबळे मुंबई, वक्ते म्हणून डॉ. अनंत राऊत नांदेड, प्रा. श्रीकिसन मोरे औरंगाबाद, डॉ. अशोक इंगळे अकोला, सुदाम सोनुले अमरावती, सुषमा पाखरे वर्धा, प्रा. रंगनाथ धांडे रिसोड यांची उपस्थिती राहील. तर कार्यक्रमाचे संचालन डॉ. विजया चक्रनारायण व आभारप्रदर्शन ललिता खडसे ह्या करतील. परिसंवादाच्या दुसर्‍या सत्रात दुपारी अडीच वाजता वंचितांची सत्ताप्राप्ती आणि बुद्धिजीवी वर्गाची भूमिका या विषयावर वक्ते आपले विचार प्रकट करतील. यावेळी अध्यक्षस्थानी प्रा. प्रकाश जंजाळ कारंजा तर वक्ते म्हणून डॉ. सुनंदा जुलमे नागपूर, डॉ. विजय जाधव वाशिम, प्रा. प्रविण कांबळे नागपूर, डॉ. भास्कर पाटील अकोला, माया दामोदर शेगांव, भास्कर भोजने बाळापूर यांची उपस्थिती राहील. तर कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रज्ञा साळवे व आभारप्रदर्शन कल्पना वाहुळे ह्या करतील. दुपारी ४ वाजता गुणवंतांना रमाई गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असून असून यावेळी उषा अंभोरे, किशोर ढमाले, मिनाताई उलेमाले, प्रा. आशालता कांबळे यांच्या हस्ते डॉ. चित्रा कुर्‍हे हिंगोली, शकुंतला गायकवाड वाशिम, अ‍ॅड. पायल गायकवाड नागपूर, वैशाली खंडारे औरंगाबाद, डॉ. ज्योती वाकोडे खामगाव, विशाखा सावंग खामगाव, संध्या पंडीत रिसोड, अनिता गवई अकोला, आम्रपाली घालेप्पा रत्नशील कलबुर्गी कर्नाटक, सुशिला खडसे औरंगाबाद, कविता थोरात बदलापूर, सोनाली मोरे पळसखेड, संजीवनी राजगुरु ठाणे, काव्यश्री घोलप रिसोड, रंजिता जंजाळ अकोला, सुनिता धुरंधर बार्शीटाकळी, सपना खरात खामगाव, रिटा खंडारे अकोला, डॉ. ललिता गिर्‍हे औरंगाबाद, प्रतिभा अवचार अकोला यांना रमाई गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. तर कार्यक्रमाचे संचालन वैशाली खंडारे व आभार प्रदर्शन शोभा खाडे ह्या करतील.

    दुपारी साडेचार वाजता सुनंदा नागदिवे अमरावती ह्या ठराव वाचन करतील. दुपारी ५ वाजता कविसंमेलन ठेवण्यात आले असून अध्यक्षस्थानी मानोराच्या जेष्ठ कवयित्री विमल वाघमारे यांची उपस्थिती राहील. या कविसंमेलनात कल्पना वाहुळे, लता इंगळे, सुनंदा नागदिवे, शिला घरडे, जयश्री सरवदे, वैशाली खंडारे, रजनी फुलझेले, शिला आठवले, प्रा. सुनिता अवचार, उज्वला देबाजे मोरे, मधुराणी बनसोड, संध्या अढागळे, अलका धनगर, अहिल्या रंगारी, दिपाली दीप, सरीता रामटेके, स्वाती चनकापुरे, सुनिता घोडगे, सुनिता इंगळे, योगिता वानखडे, ज्योती पंडीत, कुंदा सोनुले, डॉ. सुनंदा जुलमे, माया दामोदर, डॉ. सुनंदा रामटेके, सुलभाश्री सिरसाट, गंगाबाई सुरडकर, करूणा मून, माया कांबळे, मिना पाटील, सुषमा पाखरे, लता जुंबडे, सुरेखा कांबळे, माला मेश्राम, ललिता धानके, आम्रपाली रतनशील, जयश्री ढाकरगे, नलिनी मोकळे, नंदा शेजवळ, प्रभा वानखडे, सुवर्णा सिरसाट, प्रज्ञा घोडेस्वार, कविता थोरात, संजीवनी राजगुरू, लता पडघान, वनिता गावंडे, सरीता सातारडे यांची उपस्थिती राहील. कविसंमेलनाचे संचलन कविता मोरवणकर तर आभारप्रदर्शन शारदा गजभिये ह्या करतील. शेवटी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणार्‍या समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी उषा अंभोरे, स्वागताध्यक्ष मिनाताई उलेमाले तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सुभाष अंभोरे, डॉ. संजय मुन, डॉ. उत्तम अंभोरे, मिलिंद उके, सदाशिव भगत, शेषराव धांडे, प्रा. रंगनाथ धांडे, सुनिल लहाने, अप्पा जुंबडे, डॉ. अविनाश झरे, गणेश देशमुख, सूर्यभान गजभिये, विलास अंभोरे, नारायण कोडके, मोहन सिरसाट, प्रमिला शेवाळे, सिध्दार्थ देवरे, अ‍ॅड. मोहन गवई, किशोर पंडीत, सौरभ सपकाळ, महेंद्र ताजणे यांची उपस्थिती राहील. कार्यक्रमाचे संचालन दैवशिला गवंदे व आभारप्रदर्शन बेबीनंदा पवार ह्या करतील. सायंकाळी ७ ते ९ या वेळेत विद्रोही सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमाला जिल्हयातील कवी, साहित्यीक, लेखक व नागरीकांनी बहूसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे मुख्य संयोजक तथा रमाई मासिकाचे संपादक आणि रमाई फाऊंडेशन औरंगाबादचे अध्यक्ष प्रा.डॉ. रेखा मेश्राम यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या