💥वसमत येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण....!


💥शहरातील आणखी एका १६ वर्षीय मुलीला अज्ञात आरोपीने अपहरण करून पळवल्याची घटना💥 

हिंगोली : जिल्ह्यात अल्पवयील मुलींच्या अपहरणाच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत असून जिल्ह्यात मागील एक आठवड्यात चार पेक्षा जास्त अल्पवयीन मुली बेपत्ता आहेत. 

या घटनांचा तपास अद्यापही लागला नसतांना पुन्हा वसमत शहरातील आणखी एका १६ वर्षीय मुलीला अज्ञात आरोपीने अपहरण करून पळवल्याची घटना घडली असून या संदर्भात अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीच्या आईने काल दि.१८ मे २०२२ रोजी वसमत शहर पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात अहरणकर्त्यावर भादवी कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस उप निरिक्षक प्रतिभा शेटे या करीत आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या