💥पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता...!


💥देऊळगाव येथील ज्ञानोबा दुधाटे देऊळगावकर यांच्या वतीने नगर भोजन आयोजन करण्यात आले होते💥

पुर्णा/ताडकळस : ८ ता, पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथे दिनांक १ मे रोजी अखंड अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सकाळच्या सत्रात पहाटे चार ते पाच काकडा सात ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण  दुपारी तीन ते चार ज्ञानेश्वरी ग्रंथाचे प्रवचन रात्री सात ते आठ धुपारती रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन आधी कार्यक्रमाने सांगता झाली

हभप.माणिकगबाळे,जगन्नाथ देऊळगावकर,गजानन खोंडे,सिताराम दुधाटे,अंगद माहेरकर,अंगद दुधाटे,वामन झाडे महाराजाच्या यांचे काल्याचे कीर्तन शनिवार रोजी दुपारी झाले.देऊळगाव येथील ज्ञानोबा  दुधाटे देऊळगावकर यांच्या वतीने नगर भोजन आयोजन करण्यात आले होते सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी सुदाम दुधाटे दुधाटे भुजंग दुधाटे भगवान दुधाटे ज्ञानोबा दुधाटे रंगनाथराव दुधाटे माणिक गवळी पांडुरंग महाराज प्रल्हाद जाधव आदींनी पुढाकार घेतला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या