💥पुर्णा तालुक्यातील कानखेड येथील ६ वर्षीय सय्यद अल्फेश सय्यद गौस या चिमुकल्याने धरला रोजा...!


💥कानखेड ग्रामस्थांसह आप्त नातेवाईकां कडून या चिमुकल्याचे होत आहे कौतुक💥

पुर्णा : तालुक्यातील मौ.कानखेड येथील ६ वर्षीय सय्यद अल्फेश सय्यद गौस या चिमुकल्याने आज रविवार दि.०१ मे २०२२ रोजी पवित्र रमजान महिन्यातला पहिला रोजा (उपवास) धरला असून  चिमुकला कानखेड येथील सय्यद गौस सय्यद रसूल ड्रायव्हर यांचा मुलगा आहे. 


सध्या मे महिन्याचा कडकडीत उन्हाळा सुरु असून शहरात सर्वत्र ४४ डिग्री सेल्सियसचे कडक तापमान आहे आणि अश्या कडकडीत तापमानात मोठ्या मानसांचा पाण्याअभावी जीव तगमग होत आहे तरीही या कडक उन्हाळ्याच्या भयंकर परिस्थितीत या चिमुकल्याने आपल्या कँन्सरग्रस्त पित्याला अल्लाहने या कँन्सर सारख्या भयंकर आजारातून बरे करावे व राज्यासह जिल्ह्यातही राष्ट्रीय एकात्मता बळकट करावी व सर्वत्र शांतता नांदावी याकरिता रोजा उपवास धरून अल्लाकडे प्रार्थना केली अवघ्या ६ वर्षीय सय्यद अल्फेश या बालकाने कडकडीत उपवास रोजा धरला म्हणून त्याचे काका सय्यद मुक्तार सय्यद रसूल व आप्त नातेवाईक शेख सोहेल,शेख अय्यान,सय्यद सेहवाग यांच्यासह युवा नेते राज नारायनकर,मिलिंद सोनकांबळे,कुंदन ठाकूर,सुनिल जाधव,पत्रकार चौधरी दिनेश,रामा पारवे,विक्की कळसे,श्रीनिवास तेजबंद तसेच मौ.कानखेड गावातील ग्रामस्थांकडून ही सय्यद अल्फेशचे कौतुक होत आहे... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या