💥परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील डाकू पिंपरी येथील बेकायदेशीर जेसीबीद्वारे रेती उत्खनना बद्दल चौकशीचे आदेश...!


💥आ.बाबाजानी दुर्राणी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री धनजय मुंडेंकडे केलेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी गोयल यांनी दिले आदेश💥


💥डाकू पिंपरी येथील रेती घाट लिलावधारकावर होणार दंडात्मक कारवाई💥


परभणी (दि.०५ मे २०२२) : परभणी जिल्ह्यात सर्वत्र अधिकृत/अनाधिकृत रेती घाटधारक/रेती तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे निदर्शनास येत असून या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद सदस्य आ.बाबाजानी दुर्रानी यांनी लेखी स्वरूपात तक्रार दिल्यानंतर ही जिल्हा महसुल प्रशासन तथा जिल्ह्यातील पाथरी तालुका तहसिल तथा महसुल प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे शेवटी आ.दुर्रानी यांनी या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर पालकमंत्री मुंडे यांनी कानउघडणी करताच जिल्हा प्रशासन खडखडून जागे झाले असून जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी पाथरी तालुक्यातील डाकू पिंपरी येथील अवैध रेती उत्खनन प्रकरणी चौकशीचे आदेश संबंधितांना बजावले असून अहवाल आल्यापाठोपाठ कारवाईचेही स्पष्ट संकेत दिले असले तरी डाकू पिंपरी रेती घाट लिलावधारका प्रमाणेच जिल्ह्यातील अन्य रेती घाट लिलावधारकांनी सर्वत्र जेसीबी मशीनचा बेकायदेशीर वापर करीत अवैध रेती उत्खननात अतिरेकी धुमाकूळ घातला असल्याचे निदर्शनास येत असतांना व यात पुर्णा तालुका सर्वात आघाडीवर असतांना केवळ एकट्या डाकू पिंपरी रेती घाट लिलावधारकाच्या चौकशीचे आदेश काढून उर्वरीत रेती घाट लिलावधारकांना रात्रंदिवस बेकायदेशीर जेसीबी मशीनचा वापर करीत हजारो/लाखो ब्रास अवैध रेती उत्खनन करण्याची सुट दिली की काय ? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.


पाथरी तालुक्यातील डाकू पिंपरी येथील अवैध वाळू उपसा प्रकरणी आमदार दुर्राणी यांनी पालकमंत्री मुंडे यांच्याकडे पुराव्यासह लेखी तक्रार दाखल केली. पाथरी येथील उपजिल्हाधिकारी व तहसीलदार, पोलीस अधिकारी यांच्या संगनमताने दररोज जेसीबी, पोकलेन व  मोठ्या ट्रक यांच्या द्वारे हजारो ब्रास वाळू उपसा केला जातो आहे, असा गंभीर आरोपही केला होता. खुद्द जिल्हाधिकारी यांनीच काढलेल्या अटी व शर्तीचा भंग होत असल्याची तक्रारही दुर्राणी यांनी नोंदवली. स्थानिक महसूल व पोलीस यांच्याद्वारे वाळू अवैध उपसा प्रकरणी दोषींना पाठीशी घालण्यात येत आहे, असे म्हटले.

         आमदार दुर्राणी यांनी पालकमंत्री यांना ड्रोनद्वारे  शूटिंग दाखवून तसेच सीसीटीव्ही न बसवणेे, ई-पास शिवाय बेकायदा वाळूची वाहतूक करणे असे गैरप्रकार तात्काळ थोपवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. पाठोपाठ पालकमंत्री मुंडे यांनी जिल्हाधिकारी गोयल यांना ह्या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची सूचना केली होती. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी उपजिल्हाधकारी यांना आदेशित केले असून संबधित अवैध वाळू उपसा प्रकरणी संयुक्त अहवाल मागविला आहे.तसेच दोषी आढळणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.  

         दरम्यान, वरिष्ठ महसूल व पोलीस अधिकार्‍याच्या संगनमतने सुरू असलेल्या या कोट्यवधी रुपयाच्या वाळू उपसा प्रकरणी येत्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्‍न उपस्थित केला जाणार आहे. आमदार दुर्राणी यांनी महसूल विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे यापूर्वीच पुराव्यासह तक्रार नोंदवली आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात दोषी अधिकार्‍यांच्या निलंबनची मागणी विधानपरिषदेत केली जाणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या