💥सततच्या नापीकीला कंटाळून तरुण शेतकऱ्यांची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या....!


💥कळमनुरी तालुक्यातील कामठा शिवारातील घटना💥

 शिवशंकर निरगुडे : हिंगोली

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कामठा शिवारात एका तुरुन शेतकऱ्याची सततच्या नापिला कंटाळून झाडाला घेतला गळफास.सदरील घटना दि 29/05/2022 रविवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास घडली आहे गोपाळ रामराव मोरे वय वर्ष 22 असे या तरुणाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील कामठा येथील गोपाल  मोरे यांना  कामठा शिवारात एक एकर शेत आहे घरी आई वडील व भाऊ असा परिवार असून शेतातील उत्पन्ना वर तसेंच गोपाल व ईतर कुटुंबातील व्यक्ती कडून केल्या जाणाऱ्या रोज मजुरीवर त्याचा उदरनिर्वाह चालतो काल रविवार दि.२९ मे २०२२ रोजी सकाळी ११-०० वाजण्याच्या सुमारास गोपाळ मोरे हें कामठा शिवारातील एका शेतकऱ्यांच्या शेतात टैक्टरने मशागतीच्या कामावर गेले होते दुपार पर्यंत त्यांनी सुमारे एक ते दिड एकर शेतातील मशागत गेल्या नंतर त्यांनी टैक्ट्रर धूऱ्याच्या काठाला लाऊन उभें केले अन त्यानंतर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार बाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर या घटनेची माहिती तातडीने आखाडा बाळापूर पोलिसाना देण्यात आली या नंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड उपनिरीक्षक शिवाजी बोंडले .जमादार शाहेद .बाजार समितीचे संचालक भारत देसाई यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मृत गोपाळ मोरे यांचा मृतदेह खाली उतरवुन उत्तरिय तपासणीसाठी आखाडा बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे दरम्यान मृत गोपाळ मोरे हें सततची नापिकी तसेंच हाताला काम मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत होता त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न त्यांच्या समोरा उभा होता या परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे सूत्रांनी सांगितले या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यासाची प्रक्रिया सुरू होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या