💥जिंतूर तालुक्यातील बोरकिनी येथे बारव बचाव मोहीम....!


💥जिंतूर सेलू मतदारसंघाचच्या भाजपा आमदार सौ मेघना बोर्डीकर यांनी केले श्रमदान💥

जिंतूर  प्रतिनिधी. / बी.डी. रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील बोरकिनी येथील पुरातन काळातील बारव स्वच्छता अभियान राबवताना आ मेघना बोर्डीकर यांनी सकाळी ७:०० वाजता जाऊन श्रम दान केले, व तरूणांना प्रोत्साहन भेटावे त्यांचा उत्साह वाढवावा या साठी स्वतः आमदारांनी बारव बचाव मोहीम मध्ये श्रमदान केले.

 तालुक्यातील ऐतिहासीक वारसा जपला पाहीजे या उद्देशाने जिंतुर तालुक्यातील विविध ठिकाणी असलेले पुरातन बारव संवर्धनासाठी बारव स्वच्छता अभियान राबविले जात आहे. चारठाणा, बोरकिनी, जिंतूर,पुंगळा, अशा पुरातन काळापासून ज्या बारव बुजल्या असतील त्याची स्वच्छता करून या मोहिमेत सहभागी असलेल्या नागरिकांचे आमदार बोर्डीकर यांनी कौतुक केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या