💥पूर्णा येथील कै.विठ्ठलराव मोरे चे प्रभारी मुख्याध्यापक मारोती किशनराव भुसारे सेवानिवृत्त...!


💥दिव्यांगांच्या शाळा तीन प्रवर्ग तर्फे सेवानिवृत्त गौरव कार्यक्रम संपन्न💥

पुर्णा :- येथील कै. विठ्ठलराव मोरे चे प्रभारी मुख्याध्यापक मारोती किशनराव भुसारे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले या कार्यक्रमानिमित्त श्री. ज. वि. प्रसारक मंडळ पूर्णा, दिव्यांगांच्या शाळा तीन प्रवर्ग तर्फे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या सचिवा प्रा. रजनीताई भगत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख उपस्थितीत श्री. रामराव नारायणराव भुसारे ( माजी सरपंच ) व प्रा. रामचंद्र भुसारे आणि शैलेंद्र कुलकर्णी सर. यांनी सूत्रसंचलनाचे कार्य हाती घेतले व प्रास्ताविक श्री. हरिभाऊ बगाटे सर यांनी केले.


    मूकबधीर विद्यालयाच्या सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी श्री व श्रीमती भुसारे दाम्पत्य , श्री व श्रीमती वाढवे दाम्पत्य , श्री कऱ्हाळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. 

       याप्रसंगी प्रा. रजनीताई यांनी भुसारे सर यांच्या कार्याचा गौरव केला. आपले मनोगत प्रा. रामचंद्र भुसारे, गोपाळ भुसारे सर ( मु. अ. ), सोपान भुसारे ( मु. अ. ) यांनी व्यक्त केले. यावेळी भुसारे सर ( मु. अ. ) तसेच सिद्धार्थ वाढवे यांनी सत्काराला उत्तर देले 

      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वी. कदम सर, एन. बी. जाधव सर, एम. नागठाणे सर, एस. डिघोळे सर तसेच उपस्थित सगळे शिक्षकवृंद व कर्मचारीवृंद यांचे सहकार्य लाभले.....

    तसेच नावकी गावातील प्रतिष्ठित नागरिक व आप्त मित्र आणि तिन्ही प्रवर्गाच्या शाळेचे महिला व पुरुष कर्मचारी  हे उपस्थित होते आर.पिसाळ यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या