💥हिंगोली ते सेनगाव मार्गावर अपघाताचे सत्र सातत्याने सुरूच....!


💥अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणांचा मृत्यू देऊळगाव फाट्याजवळील घटना💥 

 शिवशंकर निरगुडे - हिंगोली 

हिंगोली ते सेनगाव मार्गावरील अपघात सत्र सुरूच देऊळगाव पाटीजवळ अज्ञात वाहनांच्या धडकेत तूरुनाचा जागीच मृत्यू झाला आहे आज सकाळी साडे सहा वाजता हि घटना उघडीस आली आहे मृत तरुणांची ओळख पटविन्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी सांगितले आहे 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली ते सेनगाव मार्गावर देऊळगाव पाटीजवळ आज सकाळी काही तरून मॉर्निंग वाक साठी जात असतांना त्याना रस्त्यावर एका तूरूनाचा मृत देह आढळून आला त्या नंतर त्यांनी या प्रकारची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांनी दिली हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आर .एन मळघने .जमादार गजानन पोकळे .आकाश पंडितकर .आशिष उंबरकर .अशोक धामने .मस्के यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली

पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्या तरुणांचा मृत्यु झाल्याची प्राथमिक तपासणी मध्ये स्पष्ट होऊ लागले आहे .तरुणाच्या डोक्याचा अक्षरक्ष  चेंदामेंदा झाल्यामुळे ओळख पटविने कठीण होत आहे पोलिसांनी परिसरात ओळख पटवीन्याचे काम सुरू केले आहे 

दरम्यान हिंगोली ते सेनगाव राष्ट्रीय मार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे गेल्या दहा दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी 9 जणांचा मृत्यू झाला आहे आणि आज हा एक मृत्यू असे आठ दिवसात दहा जणांचा मृत्यु झाले आहेत या मार्गावर दररोज होणाऱ्या अपघातावर आळा घालवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या