💥युवा पञकार फुलचंद भगत यांना राज्यस्तरीय 'पञकार भुषण पुरस्कार' प्रदान...!


💥निर्मीका फाऊंडेशन तथा मिडिया पार्टनर स्वराज्य वार्ता कडुन देण्यात आला पत्रकार भुषण पुरस्कार💥 

मंगरुळपीर :- मंगरुळपीर येथील पंचक्रोशीत प्रसिध्द असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा युवा पञकार फुलचंद भगत यांना यंदाचा राज्यस्तरीय 'पञकार भुषण' पुरस्कार निर्मीका फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.हरेशभाई देखणे तथा मान्यवरांच्या ऊपस्थीतीत प्रदान करण्यात आला आहे.त्यांनी पञकारीता क्षेञात सामाजीक, शैक्षणिक,राजकिय,क्रिडा अशा विविध क्षेञात जनजागृतीपर आणी ऊल्लेखनिय कार्याचा म्हणून दि.२ मे २०२२ रोजी निर्मीका फाऊंडेशन तथा मिडिया पार्टनर स्वराज्य वार्ता कडुन यंदाचा राज्यस्तरिय 'पञकार भुषण पुरस्कार'प्रदान करण्यात आला आहे.

          सदैव सामाजिक कार्याची कास धरुन तळागाळातील लोकांसाठी समाजपयोगी कार्य करणारे तसेच पञकारीतेच्या माध्यमातुन विविध क्षेञात ऊल्लेखनिय कार्य करुन जनमानसात ठसा ऊमटवणारे युवा पञकार फुलचंद भगत यांना विविध स्तरातुन याआधीही गौरवण्यात आले असुन त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.फुलचंद भगत यांनी निराधार बालकांना मदत मिळवुन देण्यासाठी पुढाकार घेवुन जिल्ह्यातील निराधारांच्या समस्या शासनदरबारी मांडुन अनेकांना न्याय मिळवुन दिला आहे.कोरोनाकाळात विविध सामाजीक ऊपक्रमाच्या माध्यमातुन लोकहिताचे काम करुन गोरगरीबांना मदत केली.अल्पकाळात पञकारीता क्षेञामध्ये आपले नावलौकीक करत अनेक समस्यांना वाचा फोडली आणी शासनदरबारी न्याय मिळवुन दिली.सामाजीक,राजकीय,क्रीया,शैक्षणिक अशा विविध क्षेञात स्वतः पुढाकार घेवुन तसेच बातमीदारीतुनही आपली चुणुक दाखवुन ऊल्लेखनिय कार्य केले.सतत गरीबांच्या प्रश्नासाठी काम करणार्‍या आणी पञकारीतेतुन समाजहितासाठी झटणार्‍या युवा पञकार फुलचंद भगत यांना यंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार निर्मीका फाऊंडेशन व स्वराज्य वार्ताकडुन 'पञकार भुषण' पुरस्काराने गौरविन्यात आले.दि.२ मे २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता कृष्णपिंगाक्ष हिल्स(कार्यालय) खंडोबाची खरपुडी रोड(शिरोली) ता.खेड जि.पुणे येथे एका अभुतपुर्ण सोहळा आयोजीत करण्यात आला होता.या सोहळ्यामध्ये  निर्मीका फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष,स्वराज्य वार्ताचे मुख्य संपादक आणी कार्यकारी संपादक तथा आयएएस,आयपिएस,गायक कलावंत,स्थानिक आमदार,खासदार व मान्यवरांच्या प्रमुख ऊपस्थीतीत हा राज्यस्तरीय 'पञकार भुषण पुरस्काराने फुलचंद भगत यांना गौरविन्यात आले आहे.फुलचंद भगत यांचे पञकारीता आणी सामाजीक क्षेञातील ऊल्लेखनिय कार्य बघता प्रशासकीय तसेच सर्व स्तरातुन नेहमी कौतुक होत असते.यंदाचा त्यांना मिळालेला 'पञकार भुषण पुरस्कार' मिळाल्याची बातमी कळताच त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत असुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.विविध ठिकाणीही मान्यवरांनी या पुरस्काराबद्दल शुभेच्छा देवून सत्कारही केले आहे.पञकार भुषण पुरस्कार मिळाल्याने समाजातील तळागाळातील शोषीत आणी गरजु लोकांसाठी पञकारीतेच्या माध्यमातुन काम करण्यासाठी मला नवी प्रेरणा आणी ऊत्साह मिळाला.युवा वर्गांनी आपल्या शक्ती आणी बुध्दीचा वापर समाजहितासाठी व विधायक कार्यासाठी वापर करावा जेणेकरुन आपण इतरांची प्रेरणा बनू असे आवाहनही याप्रसंगी फुलचंद भगत यांनी केले आहे.चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासुन करा म्हणजे इतर लोक प्रेरणा घेवून या समाजपयोगी ऊपक्रमात सहभागी होतील असे मत व्यक्त केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या