💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे शेतकऱ्यांसाठी खरीप पेरणीपूर्व चर्चासत्र संपन्न...!


💥या चर्चासत्राचे अध्यक्ष कृषिभूषण कांतराव देशमुख झरीकर हे होते💥

पूर्णा (दि.१६ मे २०२२) - तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषि योद्धा शेतकरी उत्पादक कंपनी ली, ताडकळस आयोजित खरीप पेरणीपूर्व चर्चासत्र व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. 


पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील राहुल जोगदंड यांच्या शेतावर रविवारी दि.१५ मे २०२२ रोजी संपन्न झालेल्या या चर्चासत्राचे अध्यक्ष कृषिभूषण कांतराव देशमुख झरीकर हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून  व.ना. म. कृ.वी.चे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र व्यवस्थापक डॉ.गजानन गडदे, मृद व रसायनशास्त्र विभागाच्या सहायक प्राध्यापक डॉ. पपिता गौरखेडे तसेच प्रयोगशील शेतकरी मंगेश देशमुख यांची उपस्थिती होती.

डॉ. गजानन गडदे यांनी कापूस व सोयाबीन या पिकाच्या पेरणी पूर्व व पेरणीनंतरच्या तयारी संदर्भात मार्गदर्शन केले. तर डॉ. सौ. पपिता गौरखेडे यांनी शेतीमध्ये माती परीक्षणाचे महत्व, पद्धती व त्याचे फायदे या विषयावर प्रात्यक्षिकासह सखोल मार्गदर्शन केले. पेडगाव येथील प्रयोगशील शेतकरी श्री. मंगेश देशमुख यांनी प्रचलित पद्धतीपेक्षा बी.बी.एफ. पद्धतीने सोयाबीनचे पीक घेऊन जास्तीत जास्त उत्पादन कसे काढता येईल यासंदर्भात मार्गदर्शन केले.

          महाराष्ट्र शासन व कृषी विभाग यांनी नुकतेच प्रदान केलेल्या  पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. यात मेघाताई देशमुख (जिजामाता कृषिभूषण पुरस्कार ), प्रताप काळे (उद्यान पंडित पुरस्कार ), गणपतराव शिंदे (शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार ), ओमकार शिंदे व बाबासाहेब रणेर यांना (सेंद्रीय शेतीतील कृषिभूषण पुरस्कार) सन्मान मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. रेशीम शेतीतील उत्कृष्ट कार्याबद्दल देऊळगाव येथील उद्धवराव दुधाटे तसेच प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर शिंदे यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शेतकरी उत्पादक कंपनीचे सचिव गजानन आंबोरे यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. दिलीप शृंगारपुतळे यांनी तर आभार प्रदर्शन अमृतराज कदम यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी उपस्थिती लावून या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोविंदराव दुधाटे, प्राध्यापक शिंदे, प्रताप काळे, अमृतराजजी कदम, संभाजीराव भोसले,बालासाहेब हिंगे, सुरेश दुधाटे, पांडुरंग शिंदे,पंढरीनाथ शिंदे राहुल जोगदंड यांनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या