💥दिव्यांग,विधवांच्या घरकुलांसाठी सोमवारी जिल्हा कार्यालयावर मोर्चा....!


💥महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे आयोजन💥

फुलचंद भगत

वाशिम - प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेंतर्गत दिव्यांग, विधवा, परितक्त्या महिलांना घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी वारंवार दिलेल्या निवेदनांचा प्रशासनाने विचार न केल्यामुळे येत्या सोमवार, २३ मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यासंदर्भात मनसे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात ९ मे रोजी दिलेल्या निवेदनाव्दारे मोर्चाचा इशारा देण्यात आला होता. मोर्चाची सुरुवात मनसेच्या अकोला नाका स्थित राजगर्जना कार्यालयासमोरुन होईल. दरम्यान या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने दिव्यांग, विधवा, परितक्त्या महिला व नागरीकांसह मनसे आणि राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या जिल्हयातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्यासह प्र. तालुकाध्यक्ष मोहन कोल्हे, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल राठोड, शहराध्यक्ष कृष्णा इंगळे, शहर उपाध्यक्ष गणेश इंगोले, महिला सेनेच्या संगीता चव्हाण, सिता धंदरे, सौ. वंदना अक्कर, स्मिता जोशी, राष्ट्रीय अपंग  विकास महासंघाच्या राज्य संचालीका बालीका होलगरे, जिल्हाध्यक्षा सौ. बेबी धुळधुळे, विदर्भ अध्यक्ष गोपाल मोठे, जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप सातव, जिल्हाध्यक्ष परसराम दंडे, राधेश्याम जाधव, रमेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ जाधव, प्रतिक कांबळे, प्रकाश कवडे, शंकर राऊत आदींनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या