💥पुर्णा नगर परिषदेतील भ्रष्टाचारी प्रशासकीय अधिकाऱ्यामुळे दोन कर्मचाऱ्यांची कुटुंब लागली देशोधडीला...!


💥उच्च न्यायालयाच्या आदेशासह शासकीय परिपत्रकाचा देखील अवमान ; नियमात बसत नसतांनाही नौकरीत केले कायम💥

पुर्णा (दि.२४ मे २०२२) भ्रष्टाचारात पिएचडी केलेले भ्रष्ट अधिकारी बेलगाम कर्मचारी आणि शासकीय तिजोरीवर अक्षरशः दरोडे घालून कोट्यावधी रुपयांच्या शासकीय विकासनिधीवर सोईस्कररित्या डल्ला मारणारे भ्रष्ट लोकप्रतिनिधी नगर पालिकेचे रुपांतर नरख पालिकेत करीत असल्याचे निदर्शनास येत असून 'असत्याला आर्थिक हितसंबंध जोपासत साथ अन् सत्याचा विश्वासघात' असा एकंदर कारभार पुर्णा नगर परिषदेत झाल्यामुळे सदरील नगर परिषद दुष्कृत्यात सातत्याने आघाडी घेत असल्याचे दिसत असून या संदर्भात सर्वसामान्य नागरिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या अनेक वेळा केलेल्या तक्रारी नंतर जिल्हाधिकारी परभणी यांच्यासह जिल्हा नगर पालिका प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश तर निघतात परंतु चौकशीचा अहवाल मात्र गुलदस्त्यातच राहतो त्यामुळे भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांची मालिका काही केल्या थांबता थांबत नसल्याने पुर्णा नगर परिषद जणूकाही घोटाळ्यांची जननीच झाल्याचे दिसत आहे.


पुर्णा नगर परिषदेतील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी जिल्हाधिकारी/नगर पालिका प्रशासन विभागाचे सहआयुक्त आयुक्तांसह वेळ प्रसंगी नगर पालिका प्रशासनाचे संचालक नगर विकास मंत्र्यांची देखील खोटी स्वाक्षरी मारण्यास मागेपुढे पाहत नसल्याचा गंभीर प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

पुर्णा नगर परिषद प्रशासनातील प्रशासकीय अधिकारी व आस्थापणा विभागाचे ओएस मागील विस ते बावीस वर्षापासून सातत्याने पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या पिराजी दुधे व तुकाराम गुनाजी सोळंके या दोन कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत त्यांच्या नंतर नगर परिषदेत कार्यरत झालेल्या कत्राटी कर्मचाऱ्यांना नगर परिषद प्रशासन संचनालयाच्या शासकीय परिपत्रकासह मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाच्या आदेशाची अक्षरशः पायमल्ली करीत आर्थिक अपहार करून नौकरीत कायम करीत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असतांना वरिष्ठ अधिकारी मात्र 'आयो चोरो बांधो भारा आधा तुम्हारा आधा हमारा' या पध्दतीचा अवलंब करून त्यांच्या पापावर पांगरून टाकून त्यांच्या पापाचे भागीदार होत असल्याचे उघड झाले आहे.

पुर्णा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात रोजंदारी कामगार म्हणून सन १९९२ पासून कार्यरत तुकाराम गुणाजी सोळंके व याच पाणीपुरवठा विभागात सन १९९८ पासून कार्यरत असलेले पिराजी निवृत्ती दुधे या कर्मचाऱ्यांना संबंधित भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी नौकरीवर कायम करण्यासाठी केवळ याच कारणांमुळे डावलले की संबंधित रोजंदारी कामगार त्यांच्या आर्थिक अपेक्षेची पुर्तता करू शकले नाही शासनाच्या परिपत्रकानुसार सन १९९३ ते सन २००० या कालावधीतील रोजंदारी कामगारांना नगर परिषदेने नौकरीत कायम करायला हवे परंतु पुर्णा नगर परिषदेच्या तत्कालीन भ्रष्टाचारी मुख्याधिकारी व सद्या कार्यरत आस्थापणा विभागाचे प्रशासकीय अधिकारी नंदलाल चावरे यांनी सन २००९ रोजी पाणीपुरवठा विभागात कार्यरत एका कर्मचाऱ्याला सन २००० ची जॉईनिंग दाखवून तर स्वच्छता विभागातील दोन कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे सन २०११ साली केवळ मस्टरवर नाव समाविष्ट करण्याचे आदेश असतांना त्या आदेशाचा अक्षरशः अवमान करून सन  २००० यावर्षीची जॉईनिंग दाखवून नौकरीत कायम केल्याचे निदर्शनास येत असून अश्या पध्दतीने आर्थिक अपहार करीत तत्कालीन मुख्याधिकारी व आस्थापणा विभागाचे प्रशासकीय अधिकारी नंदलाल चावरे यांनी 'जीतना मिलेगा उतना खावरे असे म्हणून पदाचा गैरवापर करीत चावरेगीरी केल्याचे' निदर्शनास येत आहे.

पुर्णा नगर परिषदेतील भ्रष्ट व घोटाळेबाज अधिकारी/कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची सातत्याने कृपादृष्टी होत असल्यामुळे संबंधित भ्रष्ट अधिकारी कर्मचारी अत्यंत मुजोर झाल्याचे निदर्शनास येत असून नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी सय्यद इमरान सय्यद अशफाक व आस्थापणा विभागाचे प्रशासकीय अधिकारी (ओएस) नंदलाल चावरे यांनी चक्क जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्या बोगस स्वाक्षरी करून नगर परिषदेत चक्क चार कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी भर्ती केल्याचे गंभीर प्रकरण मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या निदर्शनास आले परंतु सदरील प्रकरणाची चौकशी अद्यापही गुलदस्त्यात असल्याचे निदर्शनास येत असून वरिष्ठ अधिकारीच नगर परिषदेतील भ्रष्ट घोटाळेबाजांना पाठीशी घालत असल्यामुळेच नगर परिषद पाणीपुरवठा विभागात मागील विस ते पंचवीस वर्षापासून कार्यरत तुकाराम गुनाजी सोळंके व पिराजी निवृत्ती दुधे सारख्या इमानदार कर्मचाऱ्यांची कुटुंब देशोधडीला लागल्याचे दिसत आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या