💥सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली फाटलेले,नाव दुरूस्ती व अपडेट राशन कार्डचे वाटप...!


💥शिबीरातील उर्वरित 630 पिवळे व 272 केशरी कार्डचे डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले वाटप💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली फाटलेले, नाव दुरूस्ती व अपडेट राशन कार्डचे शिबीरातील उर्वरित 630 पिवळे व 272 केसरी कार्डचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. परळी तालुक्यात प्रथमच राशनकार्ड अपडेटचा उपक्रममास गरजुंची राशन कार्ड नुतनीकरण शिबीरात प्रचंड गर्दी व उदंड प्रतिसाद मिळाला आहे. 


               फाटलेले, नाव दुरूस्ती व अपडेट राशन कार्डचे शिबीर सामाजिक न्याय व विशेष मंत्री तथा बीड जिल्हाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.संतोष मुंडे यांचे श्रीनाथ हाँस्पीटल अरूणोद्दय मार्केट येथे शुक्रवार दि.6 मे रोजी उर्वरित 630 पिवळे व 272 केसरी कार्डचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. गरीब, गरजु व सर्व सामान्य जनतेचे गेल्या विस ते तिस वर्षापुर्वीचे राशन कार्ड दुरूस्ती व अपडेट , खुप जुने झाल्यामुळे फाटलेले, झिजलेले, व खराब जालेले राशन कार्ड त्यांना नुतनीकरण करून देणे, आपडेट नसतील तर ते अपडेट करून (१२ अंकी नंबर) नाव कमी किंवा नावलावून देणे गरजेचे आहे. कारण गरीब, गरजु, शेतकरी, कामगार वर्ग, सर्व सामन्य जनता, दिव्यांग, ज्येष्ठ नागरीक विधवा महिला इत्यादी समाजातील गरजू घटकास आरोग्य सेवेचा लाभ घेण्यास, बँकेत बऱ्याच व्यवहारात राशन कार्ड अती महत्वाचे असते /लागते यासाठी हे शिबीर उपयुक्त ठरले आहे. 

        तहसिल कार्यालयात  राशन कार्ड बाबतीत अनेक तक्रारी घेऊन नागरिक तहसील कार्यालयात चकरा मारतात, दलालमार्फत हजारो रुपये खर्च करतात तरी नागरिकांच्या राशन कार्ड संदर्भात असलेल्या समस्या सुटल्या नाहीत पण परळी शहरात सुरू असलेल्या या कॅम्पमध्ये डॉ.संतोष मुंडे स्वतः आलेल्या नागरिकांची समस्या जाणून त्यांच्या राशन कार्ड बाबतीत असलेली तक्रार तात्काळ जागेवर दुरुस्त करून देत आहेत.हे शिबीर गरजुवंतांना अत्यंत उपयुक्त ठरेल आहे. जे काम तहसील कार्यालयात अनेक वर्षे प्रलंबित होतो,हजारो रुपये खर्च करून पुर्ण झाले नाही ते काम डॉ.संतोष मुंडे यांनी आयोजित केलेल्या या कॅम्पमुळे शक्य झाले असल्याने अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या