💥सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील कविता धोत्रे यांची स्टाफ नर्स पदी जॉईनिंग....!


💥एकाच कुटुंबातील तीन ही बहीनी शासकीय नौकरीत💥 

शिवशंकर निरगुडे ; हिंगोली 

हिंगोली (दि.११ मे २०२२) - जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील सपना धोत्रे यांची स्टाफ नर्स परीचीका पदी जॉईनींग झाली आहे आणि आत्ता त्या परभणी येथील शासकीय सामान्य रुग्णालयात कामावर रुजू झाल्या आहेत.


सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील  धोत्रे कुटुंबातील तीन हि मुली शासकीय सेवेत काम करत आहेत सपना धोत्रे हिची आत्ता स्टाफ नर्स पदी जॉईनीग झाली आहे तर कविता धोत्रे हिची मागील दोन वर्षा पुर्वी जॉईनींग झाली आहे आणि आत्ता त्या उदगीर तालुक्यातील हेर येथील शासकीय रुग्णालयात काम करत आहेत आणि तिसरी मुलगी सेनगाव तालुक्यातील कौठा येथे पोलिस पाटील आहेत एकाच कुटुंबातील तीन हि बहिणी आज शासकीय सेवेत काम करत आहे वडिलाची हालाकीची परिस्थिती असतांना देखिल वडिलांनी मुलीना शिकवले धोत्रे कुटुंबाकडे जास्त जमीन नसल्याने त्यांनी गुरे डॊरे सांभाळून मुलीना शिक्षन शिकवले आणि एक मुलगा आहे पण तो हि मतिमंद आहे त्यामुळे त्यांनी काबार कष्ट करून मुलींनी शिकवले आणि आज ह्या तीन हि मुली शासकीय सेवेत काम करत आहेत. 

सपना धोत्रे आणि कविता धोत्रे यांचे शिक्षक प्राथमिक शिक्षन गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले आहे नी नंतर उच्च माध्यमिक शिक्षक हिंगोली येथील आदर्श कॉलेज येथे घेण्यात आले गावातील एका खरीब कुटुंबातील ह्या मुली शासकीय सेवेत लागल्या बद्दल गावकऱ्याकडून त्याचा गावात सत्कार करण्यात आला आहे यांना सर्व मार्गदर्शन खुडे साहेब यांनी केले आहे मुलींनी देखिल जिद्द मनाशी बाळगुन वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे या मुलीचा आदर्श ग्रामीण भागातील मुलींनी घ्यावी....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या