💥अबब..... ही वाहतूक कोंडी वसमत शहरातली : वसमत पोलीस यंत्रणा सुस्त ?


💥रस्ता शोधण्या साठी नागरिकांना करावे लागती तारेवरची कसरत💥

नवीद अहेमद : वसमत

वसमत शहर पोलिस स्टेशन चा ढिसाळ नियोजनामुळे वाहतूकीची कोंडी होत असल्याचे हे दृश्य शहरातील जुन्या बस स्टँड कारखाना रोड लकी हॉटेल समोर चे आहे.
  रस्ता शोधण्या साठी नागरिकांना करावे लागती तारेवरची कसरत
उपजिल्हा असलेल्या वसमत शहरात विविध गावातून शेतकरी व्यापारी व नागरिक हे बाजार पेठेत येतात तर ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात या वाहतुकीच्या कोंडीमुळे तासन्तास वाहतुकीच्या कोंडीतून मार्ग मोकळा होत नसल्याने तारेवरची कसरत करावी लागते. शहरात बिनधास्तपणे अवजड वाहने प्रवेश करतात याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. हे मात्र नक्की.
कारखाना रोड च्या शेजारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय आहे, या वाहतुकीचा कोंडीकडे उपविभागय पोलीस अधिकारी लक्ष घालतील का व शहर पोलीस स्थानकात वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश देतील का याकडे वसमत वासियांचे   लक्ष वेधून आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या