💥हिगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बाभूळगावनजीक दोन दुचाकींचा भीषण अपघात.....!


💥या भीषण अपघातात एक जन जागीच ठार तर तिघे जन गंभीर जखमी💥

 शिवशंकर निरगुडे :- हिंगोली

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव शिवारात दोन दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात या अपघातामधे एक जन ठार तर तिघे जन गंभीर जखमी झाल्याची घटना दि 18/05/2022 रोजी घटली आहे अनिल खंाडके असे मृत तरुणांचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार हिंगोली तालुक्यातील कडती व वराडी येथील चौघेजन त्यांच्या दुचाकी वाहनावर सेनगाव तालुक्यातील बाभूळगावकडे गेले होते दुपारच्या वेळी बाभूळगाव शिवारामध्ये दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली या अपघातामधे अनिल खंाडके यांचा जागीच मृत्यू झाला तर हनुमान जाधव .ऋषीकेश जाधव .हनुमान चिलगर हें गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील .उपनिरीक्षक बाबूराव जाधव .जमादार किसन डावरे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली पोलिसांनी जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले दरम्यान तिन्ही जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याना नांदेड येथे हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या