💥मालेगाव नगर पंचायत मधील खासदार निधीचा गैरवापर होत असल्याची तक्रार...!


💥बिल काढन्यासाठी बोगस ठेकेदाराच्या हातुन केले थातुरमातुर कामे ?💥

फुलचंद भगत

वाशिम-मालेगांव  स्थानिक नगर पंचायत मालेगांव मध्ये खासदार भावना गवळी यांनी लाखों रुपयाचा निधी विकास कामासाठी दिला आहे परंतु नगर पंचायत अभियंता व सार्वजनीक बांधकाम विभाग यांचे कर्तव्य योग्य पार पाडत नसल्याने सदर निधीचा गैर वापर होत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे येथिल सामाजिक कार्यकर्ते यांनी कार्यकारी सा.बा.अभियंता वाशीम यांचेकडे तक्रार दाखल केली आहे.

ठेकेदार कम कार्यकर्ते बिल काढन्यासाठी थातुरमातुर कामे करत असल्याचे दिसून येत आहे सदर तक्रारीमध्ये नमूद केले होते की,स्थानिक मालेगांव मध्ये वॉर्ड क्र 12.13.14.मध्ये सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करण्यात आले आहे सदर काम करताना मंजूर अंदाज पत्रकातिल तरतुदीनुसार कामे करण्यात आली नाही शासनाने दिलेल्या निर्णयानुसार शासन निर्णय परिपत्रक प्रमाणे गीट्टी वापरण्यापूर्वी दुसऱ्या विभागाचे उपअभियंता यांचे कडून तपासणी करून घेण्यात आली नाही सदर बांधकामात वापरण्यात आलेली कृतीमं रेती ही क्रॉस तपासणी करून चागल्या दर्जाची आहे की नाही याची तपासणी केली नाही सदर बांधकामात वरवर पाहता अंदाज पत्रक प्रमाणे कामे झाली नाही व तसेच ह्या कामाचे कोणत्या निधी अंतर्गत काम आहे त्याचे सुध्दा फलक लावन्यात आलेली नाही त्यामुळे सदर कामावर चौकशी समिती नेमणूक करून कारवाई करण्याची मागणी येथिल जागृत नागरीक सावले वॉर्ड क्रमांक 12 मालेगांव यांनी कार्यकारी अभियंता यांचे कडे लेखी तक्रार केली आहे परंतु अद्यापही अधिकाऱ्याने सदर कामाची पाहणी सुद्धा केली नाही व पूर्ण रोड ची वाट लागली असून सर्व रोड निकृष्ट झाल्याचे दिसत आहे परत लेखी कंप्लिट केली असता

सदर बांधकामाची चौकशी कडे आता मालेगांव वसियांचे लक्ष वेधले असून सामजिक कार्यकर्ते यांचे याकडे वॉर्ड क्रमांक 12.13.14.यावर काय कारवाई होणार याकडे मालेगांव वासीयांचे लक्ष लागून आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या